शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

‘संकलन बंद’चे ‘गोकुळ’चे काही संस्थांना आदेश

By admin | Updated: January 21, 2015 00:09 IST

विधानसभेचे राजकारण : करवीरमधील सहा दूध संस्थांचा समावेश

राजाराम लोंढे - कोल्हापूर  जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)शी संलग्न असणाऱ्या काही प्राथमिक दूध संस्थांना संकलन बंद करण्याचे आदेश आज, मंगळवारी सायंकाळी संघाने दिल्याने संस्थापातळीवर एकच खळबळ उडाली. करवीर तालुक्यातील सुमारे सहा दूध संस्थांना अशा प्रकारच्या नोटिसा काढल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. विधानसभा निवडणुकीच्या राजकारणातून ही कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे. अांतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर घसरल्याने दूध संघ अडचणीत आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त पावडर तयार झाली असून, संघाला दूध जास्त झाले आहे. अतिरिक्त दुधामुळे ‘गोकुळ’ला तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी आपल्या दूध संस्थेचे संकलन उद्यापासून बंद करावे, असे परिपत्रक आज सायंकाळी संघाच्या सुपरवायझरनी संबंधित प्राथमिक दूध संस्थांना लागू केले. त्यामुळे संस्थापातळीवर खळबळ उडाली. आठ दिवसांपूर्वीच राज्यातील दूध संघांनी दूध पावडरीचे दर कोसळल्याने दूध खरेदी दरात कपात केली होती; पण आपण कपात करणार नसल्याचे स्पष्टीकरण ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिले होते. चार दिवसांपूर्वी दहा लाख लिटर संकलनपूर्तीचा कार्यक्रमही जोमात करीत नेत्यांनी दूध उत्पादकांचे तोंड भरून कौतुक केले होते. पंधरा लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा लवकरच पूर्ण करा, अशा शुभेच्छाही नेत्यांनी दिल्या होत्या. मात्र, आज दूध संघाच्या प्रशासनाने काही संस्थांना असे परिपत्रक काढल्याने दूध संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या संस्था पाहिल्या तर विधानसभा निवडणुकीत विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या दूध संस्था आहेत. करवीर तालुक्याच्या उत्तरेकडील भागातील या संस्था असून राजकारणातून ‘संकलन बंद’ची कारवाई केल्याने संस्थाचालकांसह दूध उत्पादकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दूध संकलन बंद करण्याच्या नोटिसा काढलेल्या संस्था या विरोधी गटातील असल्याने या कारवाईने तालुक्यातील राजकारण ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच ढवळून निघाले आहे. ज्येष्ठ संचालकांकडून प्रकरण थंडपरिपत्रकाबाबत या संस्थाचालकांनी थेट ‘गोकुळ’च्या एका ज्येष्ठ संचालकांकडे विचारणा करून जाब विचारला. दूध उत्पादकांच्या बाबतीत राजकारण करू नका, अशी तंबी एका संस्थाचालकाने दिल्याने त्या संचालकाने हे प्रकरण थंड करीत संकलन बंद केले जाणार नसल्याची ग्वाही दिल्याने या प्रकरणावर पडदा पडल्याचे समजते. दूध संकलन बंद केल्याचे परिपत्रक काही संस्थांना काढल्याबाबत काही फोन आले होते; पण तसा कोणताही निर्णय संघाने घेतलेला नाही. - दिलीप पाटील (अध्यक्ष, गोकुळ)