शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनीच ब्लेड आणल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:59 AM

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी मोतीबिंदू शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या; पण या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून ब्लेड खरेदी करून आणण्यास भाग पाडणे तसेच सीपीआर आवारातील खासगी औषध दुकानातून ‘एमआरपी’ नसणारी ब्लेड जादा किमतीला विक्री झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देशस्त्रक्रियेसाठी रुग्णांनीच ब्लेड आणल्याप्रकरणी चौकशीचे आदेशअधिष्ठाता डॉ. अजित लोकरे : ‘सीपीआर’मध्ये मोतीबिंदूच्या झाल्या १५ शस्त्रक्रिया

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी मोतीबिंदू शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या; पण या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून ब्लेड खरेदी करून आणण्यास भाग पाडणे तसेच सीपीआर आवारातील खासगी औषध दुकानातून ‘एमआरपी’ नसणारी ब्लेड जादा किमतीला विक्री झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.याबाबत मंगळवारी सायंकाळी एका रुग्णाच्या नातेवाइकाने ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार केली होती; त्याबाबत बुधवारीच वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचे पडसाद वृत्त प्रसिद्ध होताच उमटले.येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी सुमारे १५ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याबाबत अधिष्ठाता डॉ. लोकरे यांनी, या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीत केल्या जातात. या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सर्व उपकरणे रुग्णालयानेच उपलब्ध करून द्यावी लागतात. त्यासाठी शासकीय निधी मिळतो; पण बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही.

यापुढे मोतीबिंदू शस्त्रक्रिया ठरलेल्या वेळेतच होणार, त्यासाठी उपकरणे खरेदीसाठी शासकीय निधी वेळेत आला नाही तर ‘सीपीआर’च्या निधीतून त्याची खरेदी व्हावी, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे ब्लेड रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून आणण्यास भाग पाडणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.औषध दुकानदाराचीही चौकशीसीपीआर आवारात असणाऱ्या खासगी औषध दुकानातून ही तीन ब्लेड एकूण १८० रुपयांत उपलब्ध होतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. प्रत्यक्षात या औषध दुकानातून रुग्णाच्या नातेवाइकांना ही ब्लेड ३०० रुपये दराने खरेदी करावी लागली. तसेच या ब्लेडच्या पाकिटावर कोणतीही ‘एमआरपी’ (किंमत) छापलेली नाही; तसेच खरेदीची पावतीही दिली नाही. अशा पद्धतीने औषधांची विक्री करता येणार नाही; त्यामुळे या औषध दुकानातील औषधांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. लोकरे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर