सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:02 IST2019-07-10T14:00:56+5:302019-07-10T14:02:19+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात टीका करणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून, त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन केले.

सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात टीका करणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून, त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमधून अपमानास्पद लिखाण सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. याविरोधात दसरा चौक येथे काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयसह काँग्रेसच्या अनेक घटकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी म्हणाले, ‘सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रती अभद्र टीका केली आहे. त्यांनी काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांतून अपमानास्पद लिखाण केले; त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करत, त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव घोरपडे, उमेश पोर्लेकर, पार्थ मुंडे, दीपक थोरात, सागर पोवार, स्वप्निल सावंत, बाबूराव कांबळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.