शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला संधी; मात्र, पक्ष विस्ताराचे आव्हान

By विश्वास पाटील | Published: September 09, 2023 11:55 AM

पक्षाची ही आहे ताकद..

विश्वास पाटीलकोल्हापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस काढलेल्या जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचा पारंपरिक जनाधार पुन्हा त्या पक्षाकडे आशेने पाहत असल्याचे चित्र दिसते. परंतु तेवढ्यावर समाधान मानण्यासारखी स्थिती नाही. इचलकरंजी शहरासह कागल, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा तालुक्यात पक्षाची बांधणी करण्याची गरज आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात नेत्यांना सांभाळण्यात पक्षांची वाताहत झाल्याचा अनुभव दोन्ही काँग्रेसला आला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची विधान परिषद, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि गोकूळ दूध संघात मदत होते म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पक्षाची संघटना वाऱ्यावर सोडल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये नवे नेतृत्व उभे राहू दिले नाही. पक्षाची शाखा स्थापन करायची असते हेच हा पक्ष विसरून गेल्याची स्थिती आहे. आता आमदार सतेज पाटील रस्त्यावर उतरून सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. परंतु त्यांना पक्ष वाढवायचा असेल तर काही ऑपरेशन्स ही करावीच लागतील. पन्हाळ्यात तब्बल २२ वर्षे यशवंत एकनाथ पाटील यांच्यासारख्या जिगरबाज नेत्याने हा मतदारसंघ सांभाळला. तिथे आज पक्षाचे काम कोण करते हेच सांगता येत नाही. त्यांचा मुलगा अमर पाटील हा गोकूळचा संचालक आहे. परंतु स्थानिक राजकारणात त्यांची कोरे यांच्याशी आघाडी आहे. डॉ. जयंत पाटील यांच्याकडे वारसा, शिक्षण, वय, संस्थात्मक बळ असूनही ते पण आघाडीत रमले आहेत. हीच स्थिती शाहूवाडीत आहे. तिथे कर्णसिंह गायकवाड हे सध्या काँग्रेसचे नेते म्हणून काम करतात. परंतु स्थानिक राजकारणात त्यांची कोरे यांच्याशी आघाडी आहे. विधानसभेला ते कोणती भूमिका घेणार, हे सांगता येत नाही. शाहूवाडीत दोन्ही गायकवाड मूळ काँग्रेसच्या झेंड्याखाली एक झाले तर सगळ्यांना त्यांच्यामागे धावावे लागेल; परंतु तसे घडत नाही. परंतु तसे न करता नेत्यांच्या मागे राहून पदे मिळवण्यात धन्यता मानल्याने पक्षाची वाताहत झाली आहे.कागलच्या गटातटाच्या राजकारणात नेतृत्वच न मिळाल्याने कागलमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच नाही. एकटे वंदूरचे शिवाजी कांबळे हे तालुकाध्यक्ष सोडले तर तिथे एक कार्यकर्ता पक्षाला उभा करता आलेला नाही. आजरा तालुक्यात ज्यांना काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले ते उमेश आपटे सध्या पक्षापासून बाजूला गेले आहेत. हा सुद्धा मुश्रीफ संगतीचाच परिणाम आहे. तिथे नामदेव नार्वेकर यांनी राजीनामा दिल्यापासून तालुकाध्यक्ष नाही. आता अभिषेक शिंपी सक्रिय झाले आहेत. परंतु ते काँग्रेस म्हणून पुढच्या राजकारणात किती एकनिष्ठ राहतात, याचीच उत्सुकता असेल. गडहिंग्लजला विद्याधर गुरबे, किसन व सुरेश कुराडे हे बंधू आणि संग्राम नलवडे हे पक्षासोबत आहेत. गुरबे यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. कुराडे यांची ओळख काँग्रेसचे नेते अशी जरूर आहे. परंतु तालुक्यातील काँग्रेसला त्यांचे कितपत बळ मिळते, हे विचार करण्यासारखे आहे. नलवडे यांचेही तसेच काहीसे आहे.इचलकरंजी शहरातही काँग्रेसला मोठे काम करण्याची गरज आहे. तिथे आतापर्यंत काँग्रेसला पर्यायी शब्द आवाडे असा झाला होता. हा पक्ष खासगी मालकीचा असल्यासारखे झाले. त्यामुळे आवाडे यांनी झेंडा बदलल्यावर काँग्रेस अस्तित्वहीन झाली. आता राहुल खंजिरे, अभ्यासू कार्यकर्ते शशांक बावचकर, संजय कांबळे यांच्यामुळे ती तग धरून आहे. तिला बळ देण्याचे आणि वाढवण्याचे खरे आव्हान आहे.

पक्षाची ही आहे ताकद...करवीर, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ, चंदगडमध्ये काँग्रेस लढण्याच्या तयारीत आहे. तिथे एकतरी भक्कम गट व नेता पक्षासोबत आहे. पक्षाचे आज करवीर, कोल्हापूर शहर, कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदार संघात आमदार आहेत. दहापैकी चार आमदार असलेला तसा हा जिल्ह्यातील एकमेव पक्ष आहे. विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. या बळावर लोकसभेसाठी दावा सांगितला आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांनी मनांत आणले तर लोकसभेची जागाही काँग्रेसला अवघड नाही. बहुजन समाजासह दलित, मुस्लीम, इतर अल्पसंख्याक आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडोनंतर तरुणाईमध्येही काँग्रेसबद्दल आकर्षण आहे. या उभारी देणाऱ्या बाबी असून पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी आता चांगले वातावरण आहे. जनसंवाद यात्रा त्यासाठी चांगले माध्यम ठरू शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलP. N. Patilपी. एन. पाटील