शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

अवघ शहर..... ‘सायकल’ वर ; दुमदुमला ’ग्रीन ’ कोल्हापूरचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 2:59 PM

हिरवाई नटलेल्या कोल्हापूरच निसर्ग सौदर्य जपण्यासाठी व वाढते प्रदूषण व कचरा आदीबाबत जनजागृती व्हावी. या उद्देशाने ‘लोकमत’ तर्फे रविवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ मध्ये हजारो अबालवृद्धांनी सहभाग घेत ती यशस्वी पूर्ण केली.

ठळक मुद्देप्रदूषण, कचरा मुक्तीसाठी सायकल राईडची सादहजारो अबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसादजुन्या देशी परदेशी बनावटीच्या सायकलचा समावेश

कोल्हापूर : हिरवाई नटलेल्या कोल्हापूरच निसर्ग सौदर्य जपण्यासाठी व वाढते प्रदूषण व कचरा आदीबाबत जनजागृती व्हावी. या उद्देशाने ‘लोकमत’ तर्फे रविवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ मध्ये हजारो अबालवृद्धांनी सहभाग घेत ती यशस्वी पूर्ण केली. शिवाय रांगड्या कोल्हापूरात कुस्ती, फुटबॉल, कबड्डी, नेमबाजी, अशा खेळांबरोबर ‘सायकलिंग ’चा नवा अध्यायही ‘लोकमत’च्या या सायकल राईड पासून सुरू झाला.

शहरातील कचरा, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी एक जनजागृती नव्हे तर प्रत्येकाची जबाबदारी म्हणून लोकमत ने ‘ ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’आयोजित केली होेती. हॉटेल सयाजी येथे राईडचा फ्लॅग आॅफ डॉ. डी.वाय.पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, लोकमत चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, नार्थस्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दीपक जोशी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर,दोशी सायकलचे रितेश दोशी, चाटे शिक्षण समुहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे, हार्मोकेअरचे डॉ. अमित आसळकर, हॉटेल सयाजीचे सरव्यवस्थापक मनिष खुशवाह, चिफ एक्झिक्युटिव्ह (रिटेल अ‍ॅन्ड हॉस्पिटीलिटी) सिद्धार्थ साळोखे, एक्सपोलरचे चेअरपर्सन बिपीन मिरजकर, रेडिओ मिर्चीचे आरजे मनिष आपटे, कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे चेतन चव्हाण, कोल्हापूर सायकलिंग क्लबचे चे सुचित हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते.

राईडची सुरूवातीपासूनच अबालवृद्ध सायकलपटूंमध्ये उत्साह संचारला होता. विशेषत: युवकांनी देशी परदेशी बनावटीच्या सायकलसह जनजागृती करणारे संदेशाचे फलकही आणले होते. तर विविध शाळा, शहरातील सामाजिक काम करणारे गु्रप, महिला आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सकाळी साडेसात वाजता झालेली सुरू झालेली ही राईड टेबलाई उड्डाणपूल-केएसबीपी पार्क-शाहू टोलनाका-शिवाजी विद्यापीठ कॅम्प्स ते पुन्हा टेबलाई उड्डाणपूल- पुन्हा हॉटेल सयाजी येथे साडेआठ वाजता परतली.

या मार्गावर नागरीकांनी सहभागी सायकलपटूंचे टाळ्या वाजवून प्रोत्साहीत केले. या राईडच्या माध्यमातून कोल्हापूरकरवासियांनी आगळे वेगळे वातावरण अनुभवले.

या राईडचे प्रायोजक हॉटेल सयाजी, तर सहप्रायोजक चाटे शिक्षणसमूह आहे; तर यासाठी नॉर्थस्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ‘डीवायपी’ वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, रेडिओ मिर्ची, दोशी सायकल, रिकव्हरी पार्टनर विन्टोजिनो, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब, एक्स्प्लोरर कोल्हापूर व कोल्हापूर सायकलिंग क्लब यांचे सहकार्य लाभले आहे.

‘सायकल’ चालविणे हेच आमच्या आरोग्याचे रहस्य...जेष्ठांनी उलघडले तंदुरुस्तीचे रहस्य

कोल्हापूर : वयाची साठी ओलाडंली तरी आजून एक साधी गोळी नाही, गुडघे दुखी नाही की,धाप लागत नाहीत, गेली अनेक वर्षे सायकल चालविणे हेच आमच्या आरोग्यांचे रहस्य आहे, अशी भावना ‘लोकमत’ कोल्हापूर ग्रीन राईडमध्ये सहभागी झालेल्या जेष्ठांनी व्यक्त केली.

सायकल राईडमध्ये शहरातील विविध ठिकाणी अबालवृध्दासंह जेष्ठांनी उत्साहाने सहभागी झाले होते. रविवारच्या बोचऱ्या थंडीतही पहाटे सहा वाजता अनेक जेष्ठांनी या रॅलीस हजेरी लावून तरुणांनाही लाजविले.सायकल चालविणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. पण त्यासोबतच आर्थिक बचत होतच पण प्रदूषण ही होत नाही. प्रदूषर्णचा विळख्याने अनेकांच्या आरोग्यावर पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे आजच्या युगात सायकल चालविण्या शिवाय पर्याय नाही हाच संदेश आम्ही नव्या पिढीला देण्यासाठी आम्ही सहभागी झालो असल्याचे आवर्जून अनेक जेष्ठांनी यावेळी सांगितले.

या जेष्ठांना राईड दरम्यान पुढे जाण्याची संधी देत त्यांच्या उत्सहाला चेरअप करून प्रोत्साहन दिले. यासह सहभागी जेष्ठां सोबतअनेक सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. सायकल चालवा आरोग्य समृध्द व्हा... असा संदेश या सर्व जेष्ठांनी यावेळी दिला.

 

जय भवानी,जय शिवाजीचा गजर, ग्रीन कोल्हापूरचा नारा..‘जय भवानी , जय शिवाजी ’ अशी हाक देत व ग्रीन कोल्हापूरचा नारा देत रविवारी सकाळी हॉटेल सयाजी येथून सायकल राईडला सुरुवात झाली. कोवळे ऊन आणि थंडी अशा वातावरणामध्ये चार वर्षापासून ते वयोवृद्धापर्यंत सायकल राईडमध्ये सहभाग घेतला होता. टेंबलाईवाडी उड्डाण पुल, टी.ए.बटालियन, शिवाजी विद्यापीठ परिसरातील आप्पासाहेब पवार चौक करत पुढे शिवाजी विद्यापीठ शांतीनिकेतन चौक वळून पुन्हा शिवाजी विद्यापीठ रस्ता करुन विद्यापीठ आवार करत शासकीय कृषी महाविद्यालयमार्गे सयाजीकडे सायकलस्वार आले. अनेकांनी ‘लोकमत’च्या ग्रीन कोल्हापूर,सायकल राईड’च्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देत आरोग्यसदृढ रहावे यासाठी सातत्याने सायकल राईडचे आयोजन व्हावे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

याचबरोबर सायकल मार्गावर सायकलस्वारांना टाळ्यांनी नागरिकांनी प्रोत्साहन केले. ‘लोकमत’ ने प्रदुषण टाळा आणि आरोग्य सदृढ रहावे यासाठी आयोजित केलेल्या ग्रीन कोल्हापूर,सायकल राईड या उपक्रमाबद्दल अभिनंदन करत कोल्हापूरात ‘लोकमत’ ने चांगला उपक्रम राबविला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

चार वर्षाच्या चिमुकल्याचाही सहभाग...राजारामपुरी १२ वी गल्ली येथील आदिराज उद्धव अथणे हा चार वर्षाचा चिमुकला ग्रीन कोल्हापूर,सायकल राईडमध्ये सहभागी झाला होता. त्याच्याबरोबर पालक व अथणे कुटूंबही सहभागी झाले होते. त्याला सर्वजण प्रोत्साहीत करत होते . तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

झाडे लावा, झाडे जगवा...उचगांव (ता. करवीर) येथील अनिल कोळसकर व त्यांची मुलगी अनुश्री हे दोघे ‘ग्रीन कोल्हापूर,सायकल राईड’मध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सायकलवर फांद्या लावून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत जनजागृती करत होते.

‘ निसर्ग माझी माता,ं मी तिचे रक्षण करणे हाच पर्यावरणाचा ध्यास’ हे ब्रीद वाक्य घेत पर्यावरणाची जनजागृती कदमवाडी येथील प्रशांत जाधव व त्यांची लहान मुलगी स्वरा ‘ग्रीन कोल्हापूर,सायकल राईड’मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.त्यांनी सायकल का गरजेचे हे याद्वारे दाखवून दिले.

 

‘लोकमत’च्या ग्रीन कोल्हापूर, सायकल राईडमध्ये प्रथमच सहभागी झालो. मला मस्त वाटले. सायकल फिरवण्याची आवड आहे.-हर्षवर्धन संकपाळ, साळोखेपार्क.-------------------------आठवड्यातून एकदा दहा किलोमीटर सायकल चालवते. मी नेहमी सायकल फिरवते. त्यामुळे सायकल राईडमध्ये सहभागी झालो.-समिक्षा दड्डी, समृद्धीनगर, पाचगांव.==============‘लोकमत’च्या ‘ग्रीन कोल्हापूर, सायकल राईड ’ मध्ये यात सहभागी झालो, मला छान वाटले. सायकलची आवड आहे.-संस्कृती साळोेखे, शिवाजी पेठ.============खुप मस्त वाटले. सातत्याने सायकल चालविणे आरोग्याला हितकारक आहे. त्यामुळे आरोग्य सदृढ राहते.-सत्यजित पाटील,कदमवाडी.================प्रत्येक वर्षी कोणत्याना कोणत्यातरी सायकल रॅलीत सहभागी होतो. मला आवड आहे.‘लोकमत’ने ‘ग्रीन कोल्हापूर, सायकल राईड’ हा ‘लोकमत’ने राबविलेला उपक्रम चांगला आहे.-वेद शहा, रुईकर कॉलनी.====================सायकल चालविल्यामुळे व्यायाम होतो. उंची वाढते, ध्वनी प्रदुषण टाळ्ण्यासाठी प्रत्येकाने सायकल चालविणे गरजेचे आहे.-रोहन पाटील, लक्ष्मीनगर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbycycle rallyसायकल रॅली