भारत चव्हाणकोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच मोजमाप व वजन अचूक राहावे, यासाठी अविष्टित वस्तू नियमन वैधमापन शास्त्र कायद्याची अंमलबजावणी केली जात असली तरी बाजारात कमी वजनाच्या वस्तू घालून त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. विशेषत: बाजारात एक लिटर खाद्यतेल आहे असे दाखवून ७५० मि. ली., ८०० मि. ली. पिशव्या विकल्या जात असल्याने काटामारी होत असल्याचा संशय बळावला आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख बाजारपेठेत, मोठे मॉल, शॉप येथून खाद्यतेलाच्या पॅकबंद पिशव्यांची विक्री होताना पाहायला मिळते. ग्राहक डोळसपणे पिशवीतील तेलाच्या वजनाबाबत माहिती पहात नाही. त्यामध्ये एक हजार मिलीलिटर (एक लिटर) तेल असल्याचा समज होतो परंतु प्रत्यक्षात ७५० पासून ९०० मिलीलिटर खाद्यतेल त्यामध्ये असते तेथूनच फसवणुकीला सुरुवात होत असल्याच्या तक्रारी आहेत.सध्या सूर्यफुलाचे एक लिटरची पिशवी २०६ रुपयाला मिळते. परंतु काही कंपन्यांच्या पिशवीत ८०० मिलीलिटर तेल असते म्हणजे याठिकाणी २०० मिलीलिटर तेल पिशवीत कमी असते. त्यामुळे त्याठिकाणी ग्राहकांची ४१ रुपयांची फसवणूक होत असल्याचे सांगितले जात आहे. ही बाब ग्राहकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचेही समजत नाही.
अविष्टित वस्तू म्हणजे काय?अविष्टित वस्तू म्हणजे अशी वस्तू जी बंद केलेली असते. त्या पॅकेटचे वजन, माप किंवा संख्या आधीच निश्चित केलेली असते. उदा. पॅकेटमधील तांदूळ, गहू, बिस्किटांचे पॅकेट, साबण, तेलाची बाटली, साखरेचे पॅकेटकायद्यानुसार पॅकेटवर असणारी आवश्यक माहितीवैधमापन शास्त्र नियमांनुसार पॅकेटवर पुढीलप्रमाणे माहिती असणे आवश्यक असते. उदा. उत्पादक / पॅक करणाऱ्याचे नाव व पत्ता, वस्तूचे नाव निव्वळ वजन किंवा प्रमाण, उत्पादनाची तारीख किंवा पॅकिंग तारीख, कमाल किरकोळ किंमत.
दोन वर्षांपूर्वी पॅकबंद पिशवीत स्टँडर्ड मापाचा उल्लेखाचा नियमातून काढून टाकला असल्यामुळे कारवाई करू शकत नाही. एकदा १०० ग्रॅम बिस्कीट पुड्याबाबत तक्रार आली. आम्ही त्याची तपासणी केली असता, प्रत्यक्षात पुड्याचे वजन ९३ ग्रॅम इतकेच भरले. परंतु पुड्यावर १०० ग्रॅमचा उल्लेखच नसल्याने कारवाई करता आली नाही. जर स्टँडर्ड वजनमापाचा उल्लेख असेल तरच कारवाई करता येते. - डी. पी. पोवार, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग
Web Summary : Kolhapur consumers allege deceit in edible oil packaging. One-liter pouches often contain 750-900 ml. Consumers are losing money, unaware of the discrepancy, as standard measures are not enforced.
Web Summary : कोल्हापुर के उपभोक्ताओं ने खाद्य तेल पैकेजिंग में धोखे का आरोप लगाया। एक लीटर के पाउच में अक्सर 750-900 मिलीलीटर तेल होता है। उपभोक्ताओं को फर्क पता नहीं चलने के कारण पैसे का नुकसान हो रहा है, क्योंकि मानक उपाय लागू नहीं हैं।