कोल्हापुरात लोकसंख्येच्या ३७ टक्के लोकांकडेच जनधन खाती, खात्यात किती कोटी रुपये..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:06 IST2026-03-28T18:05:50+5:302026-03-28T18:06:45+5:30

रूपे कार्डचेही वितरण : झीरो बॅलेन्सची सुविधा, शासकीय योजनांच्या अनुदानासाठी खाती उपयुक्त

Only 38 percent of people in Kolhapur district have opened Jan Dhan accounts in various banks | कोल्हापुरात लोकसंख्येच्या ३७ टक्के लोकांकडेच जनधन खाती, खात्यात किती कोटी रुपये..जाणून घ्या

संग्रहित छाया

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या म्हणजे ३८ लाखांपैकी १४ लाख ९५ हजार ११६ जणांनी जनधनची खाती विविध बँकांत उघडली आहेत. लोकसंख्येच्या ३७ टक्के जणांकडे झीरो बॅलेन्स जनधनची खाती आहेत. या खात्यात तब्बल ७१३ कोटी ३५ लाख ८५ हजार ४९७ रुपये आहेत. जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेतून झीरो बॅलेन्स खाती उघडली जात आहेत. त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही योजना आर्थिक समावेशनासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेमुळे सर्वसामाधान्य, गरीब बँकिंग सुविधांशी कनेक्ट झाले आहेत. योजनेंतर्गत खातेदारांना बचत खाते, डेबिट कार्ड, विमा सुरक्षा आणि आपत्कालीन कर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे. यातून खाती उघडण्यात ग्रामीण भागात लोक आणि महिला आघाडीवर आहेत.

काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना ?

प्रधानमंत्री जन धन योजना केंद सरकारची महत्त्वपूर्ण आर्थिक समावेश योजना आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी शून्य शिल्लक बँक खाते उघडणे, रूपे डेबिट कार्ड, अपघाती विमा अशा सुविधा दिल्या जातात.

जिल्ह्यात ७१३ कोटींवर रक्कम

ग्रामीण ११ लाख २९ हजार १२१, तर शहरी ३ लाख ६५ हजार ९९५ जनधनच्या खात्यावर ७१३ कोटींवर रक्कम आहे.

महिला खातेदारांची संख्या अधिक

एकूण जनधनच्या खात्यात ५ लाख ९५ हजार ८२० पुरुष, तर ८ लाख ९९ हजार २९६ खाती महिलांची आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची जनधनची खाती अधिक आहेत.

‘झीरो बॅलेन्स’मुळे रुपयाचाही दंड नाही

खात्यावर पुरेशा प्रमाणात पैसे नसतील, तर इतर प्रकारच्या खात्यामध्ये दंड होतो. बँकांच्या नियमाप्रमाणे कमीत कमी बॅलेन्स न ठेवलेल्या गरीब, सर्वसामान्य खातेदारांना यामुळे आर्थिक झळ बसत होती. मात्र, जनधनच्या झीरो बॅलेन्स खात्यामुळे दंडातून संबंधित खातेदारांची सुटका झाली आहे.

दहा लाख खातेदारांच्या हाती ‘रूपे कार्ड’

जनधनच्या १० लाख ९३ हजार खातेदारांना रूपे कार्ड देण्यात आले आहे.

डीबीटीमुळे योजनांचा पैसा थेट खात्यात

जनधनच्या खात्यामुळे शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे अनुदान डीबीटीद्वारे थेट खात्यावर जमा होत आहे.

आकडे बोलतात..

  • जनधनची जिल्ह्यातील एकूण खाती :१४,९५,११६
  • ग्रामीण : ११,२९,१२१
  • शहर : ३,६५,९९५
  • पुरुष : ५,९५,८२०
  • महिला : ८,९९,२९६
  • खात्यावरील रक्कम : ७,१३,३५,८५,४९७

जिल्ह्यात एकूण १४ लाखांवर जनधनची खाती आहेत. इतके खातेदार बँकिंग व्यवहाराशी जोडले गेले आहेत. जनधनच्या खात्यामुळे यांना शासकीय योजनेतून डीबीटीद्वारे अनुदान घेणे सोपे झाले आहे. - मंगेश पवार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, कोल्हापूर

Web Title : कोल्हापुर: 37% के पास जन धन खाते, करोड़ों जमा

Web Summary : कोल्हापुर में, 37% आबादी के पास जन धन खाते हैं, जिनमें कुल ₹713.35 करोड़ हैं। पुरुषों की तुलना में महिलाओं के पास ये शून्य-शेष खाते अधिक हैं, जो गरीबों के लिए प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण और वित्तीय समावेशन की सुविधा प्रदान करते हैं।

Web Title : Kolhapur: 37% Have Jan Dhan Accounts, Crores Deposited

Web Summary : In Kolhapur, 37% of the population holds Jan Dhan accounts, totaling ₹713.35 crore. More women than men have these zero-balance accounts, facilitating direct benefit transfers and financial inclusion for the poor.