अंबाबाई मंदिरात ऑनलाइन देणगीची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:26 IST2021-03-03T15:22:58+5:302021-03-03T15:26:16+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur BankingSector Kolhapur- श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे स्टेट बँकेच्या ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात मंगळवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाली.

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात मंगळवारी ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते स्टेट बँकेच्या सरव्यवस्थापक सुखविंरदर कौर यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे स्टेट बँकेच्या ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात मंगळवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाली.
यावेळी जाधव यांनी स्टेट बँकेच्या माध्यमातून भाविकांना आई अंबाबाई चरणी ऑनलाइन पद्धतीने देणगी अर्पण करता येईल, असे सांगून बँकेच्या वतीने प्रसाद वितरणासाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
बँकेच्या सरव्यवस्थापक सुखविंदर कौर यांनी यापुढेही असेच सहकार्य व देवीची सेवा करण्याची संधी बँकेला मिळत राहो, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी नवीनकुमार गुप्ता, लक्ष्मीकांत चौधरी, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव कर्मचारी उपस्थित होते.