कोल्हापुरात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू 

By समीर देशपांडे | Updated: September 13, 2023 11:22 IST2023-09-13T11:21:58+5:302023-09-13T11:22:21+5:30

कोल्हापूर :  येथील सीपीआर रूग्णालयात बुधवारी सकाळी ९ वाजता स्वाईन फ्लूने एका रूग्णाचा मृत्यू झाला. वसंत सदाशिव कदम (वय ...

One person died of swine flu in Kolhapur | कोल्हापुरात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू 

कोल्हापुरात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू 

कोल्हापूर :  येथील सीपीआर रूग्णालयात बुधवारी सकाळी ९ वाजता स्वाईन फ्लूने एका रूग्णाचा मृत्यू झाला. वसंत सदाशिव कदम (वय ६६)रा. सरवडे ता. राधानगरी असे मृताचे नाव आहे. 

गेले आठ दिवस कदम हे तापाने आजारी होते. त्यांची १० सप्टेंबरला चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी अशा रूग्णांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनांप्रमाणे उपचार सुरू करण्यात आले. 

दरम्यान आज, बुधवारी सकाळी त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच सकाळी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक महिन्यातील सीपीआरमधील स्वाईन फ्लूने दगावलेला हा पहिला रूग्ण आहे.

Web Title: One person died of swine flu in Kolhapur