kolhapur News: खुनप्रकरणी कुरुंदवाडच्या एकास जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 20:14 IST2023-06-22T18:31:01+5:302023-06-22T20:14:08+5:30
सतरा साक्षीदार व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

kolhapur News: खुनप्रकरणी कुरुंदवाडच्या एकास जन्मठेप
जयसिंगपूर : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून एकाचा खुन केल्याप्रकरणी कुरुंदवाडच्या दिलीप नायकू माळी (वय ३८) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत माहिती अशी, २४ मार्च २०१५ रोजी आरोपी दिलीप माळी याने पत्नी दिपाली माळी हिचे शेजारी राहणारा दस्तगीर अल्लाबक्ष बागवान याच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून बागवान याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन खून केला होता.
हल्ल्यावेळी बागवान याची पत्नी परवीन बागवान हिच्यावरही माळी याने कुऱ्हाडीने हल्ला केल्याने ती जखमी झाली होती. कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सतरा साक्षीदार व सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने माळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.