शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नजरचुकीने एक लाख रुपये सेंड झाले; कोल्हापुरातील प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:54 IST

पोलिसांनी केले रिक्षाचालकाचे कौतुक

कोल्हापूर : नाव आणि मोबाईल नंबरमधील साधर्म्यामुळे बांधकाम कामगार ठेकेदार लक्ष्मण दयाप्पा शिंदे (वय ४५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांच्याकडून यूपीए पेमेंटवरून नजरचुकीने एक लाख रुपये रिक्षाचालक लहू अभिमान कांबळे यांना सेंड झाले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फोन करताच स्वत: पोलिस ठाण्यात पोहोचून कांबळे यांनी लाखाची रक्कम परत केली. प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी कांबळे यांचे कौतुक केले.बांधकाम कामगार ठेकेदार लक्ष्मण शिंदे हे पत्नी आणि मुलासोबत राजेंद्रनगरमध्ये राहतात. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास व्यवसायातील जीएसटीची रक्कम भरण्यासाठी ते स्वत:च्या दोन बँक खात्यांपैकी एका खात्यावर पैसे जमा करीत होते. मोबाईल नंबरमधील साधर्म्य आणि नावातील 'एल' या आद्याक्षरामुळे त्यांची गफलत झाली.

नजरचुकीने त्यांनी एक लाख रुपये स्वत:च्या मोबाईल नंबरऐवजी लहू कांबळे यांच्या मोबाईल नंबरवर पाठवली. त्यानंतर खात्यावरील रक्कम तपासताना त्यांना एक लाख रुपये दुसऱ्याच व्यक्तीच्या नंबरवर गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अंमलदार सुप्रिया कांबळे यांना घडलेला प्रकार सांगितला.सुप्रिया कांबळे यांनी पैसे गेलेल्या नंबरवर लहू कांबळे यांना फोन करून त्यांच्या खात्यावरील रक्कम तपासण्यास सांगितले. तसेच चौकशीसाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. दुपारच्या विश्रांतीसाठी घरी पोहोचलेले रिक्षाचालक कांबळे यांनी मोबाईलवरून बँक बॅलन्स तपासताच त्यांना एक लाख रुपये जमा झाल्याचे लक्षात आले.काही वेळातच रक्कम परतकाही वेळातच राजारामपुरी पोलिस ठाण्यात पोहोचून त्यांनी लाखाची रक्कम शिंदे यांच्या नंबरवर परत पाठवली. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू आणि शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालक लहू कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.