शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ फौंडेशनकडून ‘साहस’ला एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

कोल्हापूर : नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने साहस फौंडेशनला एक लाखाची आर्थिक मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश फौंडेशनचे अध्यक्ष ...

कोल्हापूर : नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने साहस फौंडेशनला एक लाखाची आर्थिक मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश फौंडेशनचे अध्यक्ष व ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी ‘साहस डिसॅबिलिटी रिसर्च ॲण्ड केअर फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. नसीमा हुरजूक यांच्याकडे सुपुर्द केला.

डॉ. नसीमा हुरजूक म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सामाजिक कार्याचा आलेख प्रचंड आहे. त्यांचाच सामाजिक वारसा नवीद मुश्रीफ समर्थपणे पुढे चालवीत आहेत. अपंगांना रोजगार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर जगण्यासाठी सक्षम करणे, हे ‘साहस’चे मुख्य उद्दिष्ट आहे. फौंडेशन व दिव्यांग निधीतून कोल्हापूर शहरासह मुंबई, पुणे, सातारा, सांगली या ठिकाणी दिव्यांगांसाठी सोयीस्कर वसतिगृहांची सोय करणार असल्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.

नवीद मुश्रीफ म्हणाले, डॉ. नसीमा हुरजूक यांचे दिव्यांगांना सन्मानाने जगणे मिळवून देण्याचे कार्य अनमोल आहे. त्यांच्या या महान कार्यात खारीचा वाटा म्हणून आपलेही थोडे योगदान असावे, या कर्तव्यभावनेने आमची ही मदत आहे. यावेळी सीताराम पाटील, के. डी. पाटील, मधुताई पाटील, रंजना पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी : नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने ‘साहस फौंडेशन’ला एक लाख मदतीचा धनादेश नविद मुश्रीफ यांच्या हस्ते डॉ. नसीमा हुरजूक यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. (फाेटो-०६०७२०२१-कोल-मुश्रीफ फौंडेशन)