हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
By उद्धव गोडसे | Updated: September 17, 2024 23:04 IST2024-09-17T23:02:32+5:302024-09-17T23:04:54+5:30
विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या घटनेने खळबळ

हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: विसर्जन मिरवणुकीत खाद्य पदार्थांची गाडी लावण्याच्या वादातून इम्रान इमाम मुजावर (वय ३२, रा. आराम कॉर्नर, शिवाजी रोड, कोल्हापूर) याचा चाकूने भोसकून खून झाला. हललेखोर युसुफ अलमसजीत (दाजी) याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. विसर्जन मिरवणूक सुरू असताना ऐन गर्दीच्या वेळी शहरातील गर्दीच्या ठिकाणी खून झाल्याने शहरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी आराम कॉर्नर येथे धाव घेऊन जखमी मुजावर याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, छातीत चाकूचा वर्मी घाव लागल्याने मुजावर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोर युसुफ याला ताब्यात घेतले. खून झाल्याची माहिती मिळताच मुजावर याच्या नातेवाईकांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली.