शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बिद्रेवाडी येथे एकाचा खून; वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बॅटरी फेकली पण जीव गेला दुसऱ्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2024 20:18 IST

बिद्रेवाडी गावच्या हद्दीत घडली ही घटना घडली.

नेसरी: बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज)येथे जमिनावर सुटून आलेल्या आपल्या वडिलांच्या खुनाच्या आरोपीला मोटारसायकलची बॅटरी फेकून मारत असताना नेम चुकल्याने त्याच्यासोबत असलेल्या अजित उर्फ गोपाळ मारुती गुरव (वय ४५) याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना मंगळवारी (दि.१९) दुपारी साडेतीनच्या सुमारास बिद्रेवाडी गावच्या हद्दीत घडली ही घटना घडली.

ऐन निवडणुकीत घडलेल्या अकास्मिक घटनेने गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी आकाश उत्तम नाईक (30) व लखन परशराम नाईक (28) रा. वाटंगी यांना दोन तासाच्या आत अटक केली आहे. 

अधिक माहिती अशी, बिद्रेवाडी येथील उत्तम भरमू नाईक (वय ५०) याचा 'माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस', असे म्हणून  गल्लीतीलच सचिन भीमराव नाईक (वय ३६) याने जानेवारी महिन्यात लाकडी ओंडका मारुन ठार मारले होते. हा राग वडील भीमराव नाईक यांचा मुलगाआकाश याने धरला होता. आज दुपारी सचिन नाईक व मयत अजित गुरव हे नेसरीकडे येत होते तर आकाश नाईक व लखन नाईक हे नेसरीकडून मोटारसायकल बॅटरी दुरुस्त करून बिद्रेवाडी गावी येत असताना गावच्या वेशीवर समोरासमोर आले. यावेळी सचिन हा आकाशकडे बघून हसला त्याचवेळी आकाशने बॅटरी सचिनच्या दिशेने जोरात फेकली  मात्र, त्याचा नेम चुकला अन् त्याच्यासोबत असलेल्या अजित गुरव याच्या डोक्याला बसली.अती रक्तस्त्राव होऊन अजितला जीव गमावावा लागला. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली अन आरोपी दोन तासात जेरबंद झाले. अधिक तपास सपोनि कमालसिंग रजपूत करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी