रेगे तिकटीजवळ पुर्व वैमन्यसातून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:02 IST2021-05-28T17:00:44+5:302021-05-28T17:02:20+5:30
Crimenews Kolhapur : रेगे तिकटीजवळ पुर्व वैमन्यासातून तरूणास दगड मारून जखमी केल्याप्रकरणी दोघाजणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद जखमी दर्शन धर्मदास खत्री (वय २९, सध्या रा. कोयना कॉलनी, गांधीनगर, मुळ रा. शुक्रवार पेठ, तेली गल्ली) यांनी दिली.

रेगे तिकटीजवळ पुर्व वैमन्यसातून एकास मारहाण
कोल्हापूर : रेगे तिकटीजवळ पुर्व वैमन्यासातून तरूणास दगड मारून जखमी केल्याप्रकरणी दोघाजणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद जखमी दर्शन धर्मदास खत्री (वय २९, सध्या रा. कोयना कॉलनी, गांधीनगर, मुळ रा. शुक्रवार पेठ, तेली गल्ली) यांनी दिली.
शुभम मधुकर माजगावकर (वय २६, रा. बजाप माजगावकर तालीम जवळ, कुंभार गल्ली,गुरुवार पेठ), सतिश सर्जेराव माजगावकर (वय २३, रा. जोशी गल्ली, शुक्रवार पेठ) गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे अशी आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, फिर्यादी दर्शन हा मित्र श्रेयस भोसले, अनिकेत घाडगे, प्रसाद कातवरे यांच्यासोबत रेगे तिकटी चौकाजवळ असणाऱ्या श्रीकृष्ण तरुण मंडळाजवळ गप्पा मारत बसला होता. या दरम्यान संशयित शुभम व सतीश तेथे येऊन दोघांनी फिर्यादीला पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर संशयित सतीश याने डोक्यात दगड घालून फिर्यादीस जखमी केले. तर संशयित सतीशने फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीचे दगड मारून नुकसान केले. याबाबतचा तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.