शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत दुप्पट परताव्याचे आमिष, पुण्यातील कबाना कॅपिटलकडून सव्वा कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:27 IST

कबाना कॅपिटल नावाची कंपनी असून, या कंपनीमार्फत शेअर बाजारात पैसे गुंतवले जातात

कोल्हापूर : तीन महिन्यात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील कबाना कॅपिटल्स कंपनीने कोल्हापुरातील गुंतवणूकदारांची १ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत उदय राजाराम शिंदे (वय ३६, रा. सरगम विहार, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, तीन संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.विवेक अरोरा (रा. भावनगर, गुजरात), अनुप जरगनगर उपाध्याय (रा. उत्तमनगर, ता. हवेली, जि. पुणे) आणि गोविंद विश्वनाथ मुळे (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांची पुण्यात कबाना कॅपिटल नावाची कंपनी असून, या कंपनीमार्फत शेअर बाजारात पैसे गुंतवले जातात. तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादी उदय शिंदे यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला चांगला परतावा मिळाल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या काही मित्रांनाही कबाना कॅपिटलमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.जून २०२२ मध्ये अचानक कंपनीने शिंदे यांच्या खात्यातील रक्कम इतरत्र वळविली. याबाबत विचारणा केली असता कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार विचारणा केल्यानंतरही गुंतवलेली मूळ रक्कम आणि परतावे मिळत नसल्याने अखेर शिंदे यांनी ३० नोव्हेंबरला शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPuneपुणेshare marketशेअर बाजारPoliceपोलिस