बनावट लेटरहेड वापरून शासनाची फसवणूक; कोल्हापुरातील एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:59 IST2025-09-25T11:58:27+5:302025-09-25T11:59:30+5:30
कोल्हापूर : पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड, सरपंच, ग्रामसेवकांचे खोटे शिक्के वापरून ...

बनावट लेटरहेड वापरून शासनाची फसवणूक; कोल्हापुरातील एकास अटक
कोल्हापूर : पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड, सरपंच, ग्रामसेवकांचे खोटे शिक्के वापरून नागपूरच्या पशु व मत्सविज्ञान विद्यापीठ व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी एकाला अटक केली. निरंजन दिलीप गायकवाड (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ग्रामसेवक अजित राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यास अटक करण्यात आली आहे.
पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये ३० जून २०२५ पोपट नारायण कर्जुले यांनी ग्रामपंचायतीकडे गट क्र ५/५ मधील खाते क्रमांक २३८८३ ची माहिती मागितली होती. त्यामध्ये शेळीपालन शेड असलेला खरा व सत्यप्रत उतारा तसेच सोबत जोडलेला दाखला खरा आहे की खोटा याची माहिती मिळावी म्हणून अर्ज केला होता. अर्जासोबत जोडलेल्या दाखल्यावर ७ मे २०२५ अशी तारीख नमूद होती.
हा दाखला पहिला असता ग्रामपंचायतीचे लेटरपॅड, शिक्का तसेच सहीदेखील आपली नसल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे पोपट नारायण कर्जुले (रा. तामसवाडी, ता. नेवासा बादुला बहिरोबा, वाटळमिशन जि. आहिल्यानगर) यांना दाखला पाचगांव ग्रामपंचायतीने दिला नसलेबाबत ४ जुलै २०२५ रोजी कळविले.
दरम्यान, कर्जुले यांनी माहिती अधिकारात महाराष्ट्र पशु व मत्सविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून मिळविली. बोगस दाखला हा निरंजन गायकवाड, सचिव महालक्ष्मी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था कोल्हापूर अंतर्गत पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याच्या हस्तांतर व स्थलांतर प्रस्तावाला जोडला असल्याचे निदर्शनास आले. आल्यानंतर गायकवाड याच्या विरोधात करवीर पोलिसांत तक्रार देण्यात आली.