Navratri 2023: दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी अलंकारीक पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 04:59 PM2023-10-16T16:59:27+5:302023-10-16T17:02:05+5:30

अमोल शिंगे जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील नवरात्रोत्सवातील आजचा दुसरा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आज, ...

On the second day of the Navratri festival Jotiba three petalled stone ornamental puja of the lotus flower | Navratri 2023: दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी अलंकारीक पूजा

छाया - दीपक जाधव

अमोल शिंगे

जोतिबा: श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील नवरात्रोत्सवातील आजचा दुसरा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आज, सोमवारी श्री जोतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी अलंकारीक पूजा बांधण्यात आली होती. जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडल्या. महाभिषेकानंतर श्री जोतिबाची आज श्री जोतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी अलंकारीक पूजा बांधण्यात आली होती. 

अध्यात्मिकदृष्ट्या मनुष्याच्या शरीरात सत्व, रज आणि तम ते तीन गुण असतात याच तीन गुणांचे प्रतिक म्हणजे या कमळपुष्पच्या तीन पाकळ्या होय. दरम्यान आज भाविकांनी पहाटे पासूनच जोतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती. आजही भाविकांनी श्री जोतिबाला ऊस आणि कडकन्यांचा प्रसाद अर्पण केला.

Web Title: On the second day of the Navratri festival Jotiba three petalled stone ornamental puja of the lotus flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.