kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी जोतिबाची नागवल्ली अलंकारी बैठी महापुजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:38 IST2025-09-22T17:35:24+5:302025-09-22T17:38:21+5:30
दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी जोतिबाची नागवल्ली अलंकारी बैठी महापुजा
जोतिबा: दख्खनचा राजा जोतिबाच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या धार्मिक उत्साहात सुरुवात झाली. उंट, घोडे वाजंत्री आणि देवसेवक यांच्या लवाजम्यासह निघालेल्या धुपारती सोहळ्याने ग्रामदैवतांचा घट बसविण्याचा विधी संपन्न झाला. आज पहिल्याच दिवशी तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
आज पहाटे ३ वाजता महाघंटेचा नाद करुन दरवाजे उघडण्यात आले. पहाटे ४ ते ५ जोतिबा मूर्तीची पाद्य पुजा, 'मुख मार्जन, काकड आरती झाल्यानंतर पहाटे ५ ते ६ पंचामृत महाभिषेक विधी संपन्न झाला. सकाळी ६ वाजता घटस्थापने निमित्त नागवल्ली म्हणजेच खाऊच्या पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधण्यात आली. ही पुजा अंकुश दादर्णे, अदिनाथ लादे, दगडू भंडारी, विजय भंडारे, प्रल्हाद झूगर यांनी बांधली.
मंदिरातील देवतांचे घट बसविण्यासाठी उंट, घोडे, देव सेवक, वाजंत्रीच्या लवाजमास धुपारती सोहळा मार्गस्थ झाला. यावेळी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झूगर, पोलिस पाटील बाळासाहेब कदम पाटील सहभागी झाले.