Kolhapur News: आईच्या मृत्यूची बातमी समजताच धक्का बसला, दुसऱ्याच दिवशी मुलानेही जीव सोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:36 IST2023-06-16T17:28:54+5:302023-06-16T17:36:15+5:30
कृष्णा नदीमध्ये हात-पाय धुवायला गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडून आईचा मृत्यू झाला

Kolhapur News: आईच्या मृत्यूची बातमी समजताच धक्का बसला, दुसऱ्याच दिवशी मुलानेही जीव सोडला
दत्तवाड : सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथील तरुणाला आईच्या मृत्यूची बातमी सहन न झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोपाळ खंडू पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. आईपाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गोपाळ पाटील यांना डेंग्यू, मलेरिया या आजारावरती उपचार करण्यासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आई बाबाई खंडू पाटील या मंगळवारी (दि. १३) सकाळी कृष्णा नदीमध्ये हात-पाय धुवायला गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला.
दवाखान्यात उपचार सुरू असतानाच गोपाळ यांना आईच्या मृत्यूची बातमी समजल्याने धक्का बसला. बुधवार पहाटे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आईपाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोपाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. पंचायत समिती माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांचे बंधू होत.