शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

उदगावातील पुरातन मंदिर अद्याप गायबच

By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST

देवस्थान समितीचे दुर्लक्ष : शिवसागर मंदिराचा शोध घेणे गरजेचे

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील पुरातन शिवसागर मंदिराचे गूढ कायम असून, याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुद्धा नाममात्र लक्ष दिले आहे. पुरातन मंदिरे जतन करण्याची सक्त गरज असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.उदगाव येथील पुरातन रामलिंग मंदिर, गावातील हनुमान, कृष्णाकाठावरील श्रीपाद स्वामी मंदिर व शिवसागर मंदिर ही मंदिरे शाहू महाराज संस्थान काळातील आहेत. सध्या धर्मालय आयुक्त व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या सरकारी विभागाकडे नोंद असून, सध्या उदगाव ग्रामपंचायतीकडे या जमिनी आहेत. येथील शिवसागर मंदिराच्या नावे पाच एकर जमीन असून, ही जमीन १९५९ पासून आजतायत शेतकऱ्यांकडे आहेत. मात्र, गावात पुरातन शिवसागर मंदिर हे कोठे आहे, याबाबत गूढ कायम आहे.उदगाव येथे १४ मे रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उदगाव येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये गावपातळीवर १५ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीने शोधमोहीम राबविली. मात्र, अद्याप त्यांना मंदिर सापडले नाही. शिवसागर मंदिराची सर्व खात्यांकडे नोंद असून देखील मंदिर कोठे आहे, याची माहिती मिळाली नाही. पश्चिम महाराष्ट्र समितीचे सहायक सचिव प्रमोद पाटील, मिलिंद घेवारे यांनी याची दखल घेतली होती. मात्र, अजून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. मंदिराची शेती सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उदगावमध्ये पुरातन मंदिरांची दखल घेऊन शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)उदगाव येथील पुरातन शिवसागर मंदिर हे गायब असून, याकडे शासनाने लक्ष्य देऊन, शोध मोहीम राबवून पुरातन मंदिरे जतन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच या मंदिराकडे असलेल्या शेतजमिनी जाण्याच्या मार्गावर आहेत. तरी या खात्याने लवकरात लवकर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-शीतल आंबी, स्थानिक पुरातन देवस्थान समिती सचिव.