शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

२७ ऐवजी १४ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: August 13, 2016 00:38 IST

इचलकरंजीतील कृष्णा दाबनलिका : वारणा कार्यान्वित होईपर्यंत गरज

इचलकरंजी : शहरासाठी नवीन वारणा नळ पाणी योजना मंजूर झाली असली तरी ती कार्यान्वित होईपर्यंत चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत इचलकरंजीकरांची तहान भागविण्यासाठी कृष्णा नळ योजना आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णा योजनेची दाबनलिका बदलण्याचा २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्याऐवजी आवश्यक तितकाच १४ कोटी रुपयांचा प्रस्ताव करून तो राबविण्याच्या हालचाली नगरपालिकेत सुरू आहेत.शहरास पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांतून पाणी उपसा करून हे पाणी नळाद्वारे पुरविले जाते. पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे जानेवारी ते जून असे सहा महिने तेथून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंद होतो. शहरवासीयांना फक्त कृष्णा नदीतील पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सहा महिन्यांच्या कालावधीत कृष्णा योजनेतून चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो. कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यास तिथून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शहरवासीयांना आठवडाभर पाणी मिळत नाही. कृष्णा योजनेकडील १९ किलोमीटर दाबनलिका टाकून इचलकरंजीत पाणी आणले जाते. ही दाबनलिका जमिनीखालून टाकण्यात आल्यामुळे दाबनलिकेवर शेतातील रासायनिक खतांचा परिणाम होऊन ती कमकुवत झाली आहे. अकरा किलोमीटरची दाबनलिका बदलणे अत्यावश्यक आहे, तर कृष्णा नदीतील पाणी उपसा करणाऱ्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील जॅकवेलमधील पाण्याचे पंपसुद्धा जुने झाल्यामुळे त्याची क्षमता कमी झाली आहे.दरम्यान, शासनाने ७२ कोटी रुपयांची नवीन वारणा नळ योजना मंजूर केली. त्यामुळे आता कृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याची आवश्यकता नाही म्हणून २७ कोटी रुपयांचा असलेला प्रस्ताव रद्द करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या. मात्र, वारणा योजना तयार होण्यासाठी किमान चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत कृष्णा योजनेचे महत्त्व लक्षात घेता ही अत्यावश्यक आहे, असा सूर नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांतून उमटू लागला. अशा पार्श्वभूमीवर नगरपालिकेमध्ये काही प्रमुख नगरसेवकांच्यात झालेल्या बैठकीत आवश्यक तेवढीच दाबनलिका बदलणे व जुना असलेला एकतरी पंप नवीन घेणे, असा चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे देऊन तो मंजूर करण्याचे ठरले.पाणीपुरवठा सभापतींची उच्च न्यायालयात याचिकाअकरा किलोमीटरची दाबनलिका बदलणे आणि पंप नवीन घेणे, यासाठी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर झाला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे काम नगरपालिकेऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने करावे, म्हणून आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रयत्न केले.