कोल्हापूरच्या लेकीचा विषयच हार्ड! नऊवारी साडी परिधान करून केली १८०० फूट रॅपलिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:15 IST2026-03-11T12:11:57+5:302026-03-11T12:15:30+5:30
इतकेच नव्हे तर त्यांनी पन्हाळगड ते पावनखिंड हा सुमारे ५३ किमीचा ऐतिहासिक पदभ्रमण मार्ग पाच वेळा पूर्ण केला आहे

कोल्हापूरच्या लेकीचा विषयच हार्ड! नऊवारी साडी परिधान करून केली १८०० फूट रॅपलिंग
कोल्हापूर : हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा (सुमारे १८०० फूट खोल) रॅपलिंग करत कोल्हापूरच्या लेकीने कोल्हापूरचा साहसीबाणा जपला आहे. नुपूर अक्षय मठकर, असे या धाडसी लेकीचे नाव. विशेष म्हणजे नुपूर यांनी नऊवारी साडी परिधान करून ही रॅपलिंग केली आहे.
नुपूर यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने किल्ले भटकंतीला सुरुवात केली. स्वराज्याच्या इतिहासाशी नाळ जोडत त्यांनी आजपर्यंत अनेक किल्ल्यांची यशस्वी मोहीम पूर्ण केली आहे.
त्यांनी भैरवगड, वजीर सुळका, नागफणी, अलंग-मदन-कुलंग, साल्हेर, गोरखगड, कोकणकडा, वासोटा यांवरही यशस्वी चढाई केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी पन्हाळगड ते पावनखिंड हा सुमारे ५३ किमीचा ऐतिहासिक पदभ्रमण मार्ग पाच वेळा पूर्ण केला आहे.
कोल्हापुरातील संभाजीनगरात राहणाऱ्या नुपूर अनिल चोडणकर या लग्नानंतर नुपूर अक्षय मठकर झाल्या. सध्या त्या सावंतवाडी येथे स्थायिक झाल्या असून, कोकण आणि गोवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा शोध घेण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे.