corona virus -एनएसयुआयची ‘कोरोना’बाबात जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 16:10 IST2020-03-11T16:09:45+5:302020-03-11T16:10:49+5:30
जगभरात कोरोना व्हायरस पसरला असून, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्यावतीने बुधवारी मिरजकर तिकटी येथे जनजागृती केली.

कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्यावतीने बुधवारी मिरजकर तिकटी येथे कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यात आली.
कोल्हापूर : जगभरात कोरोना व्हायरस पसरला असून, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्यावतीने बुधवारी मिरजकर तिकटी येथे जनजागृती केली.
हातामध्ये फलक घेऊन, तोंडाला मास्क बांधून विद्यार्थी संघटेनेच्यावतीने दुपारी या ठिकाणी जनजागृती करून उपस्थित नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या. मोहिमेबाबत शहराध्यक्ष अक्षय शेळके म्हणाले, कोरोना व्हायरस (कोव्हीड -१९) चा आता महाराष्ट्रातही प्रवेश झाला आहे.
ही अत्यंत आरोग्यविषयक गंभीर आणीबाणी आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जाणीवजागृती मोहीम घेतली आहे. शहरातील महाविद्यालये, विद्यापीठ, वसतिगृह, चित्रपटगृहे व इतर सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीसाठी शहर एनएसयूचे कार्यकर्ते प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत.
मोहिमेत जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, अमित चव्हाण, आदित्य कांबळे, साईराज पाटील, रोहित पाटील, यश शिर्के, अभी भोसले, सुशांत चव्हाण, अक्षय जाधव, संकेत जोशी, सौरभ घाटगे, सत्यजित शेजवळ, आदी उपस्थित होते.