शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

..आता कशी वाजवली घंटी, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना डिवचलं; कोल्हापुरातील फलक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:19 IST

कोल्हापूर : आता कशी वाजवली घंटी.. अशी विचारणा करणारा आणि मुख्यमंत्र्यांनाच थेट डिवचणारा फलक आमदार सतेज पाटील यांच्या छायाचित्रासह ...

कोल्हापूर : आता कशी वाजवली घंटी.. अशी विचारणा करणारा आणि मुख्यमंत्र्यांनाच थेट डिवचणारा फलक आमदार सतेज पाटील यांच्या छायाचित्रासह युवक कॉंग्रेस, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सोमवारी दाभोळकर कॉर्नरला लावून धमाल उडवून दिली. कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून शाहू छत्रपती विजयी झाले आणि शिंदेसेनेचे उमेदवार माजी खासदार संजय मंडलिक पराभूत झाल्याने हा फलक झळकला आहे.त्याचे घडले असे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात उमेदवार होते. हे दोन्ही उमेदवार जिंकायलाच पाहिजेत यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. अनेक जोडण्या लावल्या. त्यासाठी ते येथे अनेक दिवस तळ ठोकूनही होते. प्रचाराच्या सांगता रॅलीसही ते ५ मे रोजी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरसाठी आपल्या सरकारने विविध कामांसाठी प्रचंड निधी दिल्याची आठवण करून दिली. आमच्या सरकारने टोल घालवला; परंतु तो कुणा लादला होता अशी विचारणा त्यांनी रॅलीतील कार्यकर्त्यांना केली. त्यावर कार्यकर्त्यांनी बावड्याच्या बंटी पाटील यांनी असे उत्तर दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याच बंटी पाटलांची या निवडणुकीत आपल्याला घंटी वाजवायची आहे, असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात मंडलिक यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसने आता कशी वाजली घंटी.. अशी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारणारा करणारा फलक लावला. त्याची दिवसभर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री