दहा गुंठ्यांचाही आता नकाशा मिळणार, आधारसारखा यूएलपीएन नंबर होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' तालुक्यापासून सुरुवात

By भीमगोंड देसाई | Updated: March 18, 2026 12:31 IST2026-03-18T12:29:41+5:302026-03-18T12:31:00+5:30

जमीन पोटहिश्शाची मोफत मोजणी : ‘जेवढा नकाशा तेवढा सातबारा’ होणार

Now even ten Gunthas will get a map, ULPN number like Aadhaar will be available Starting from this taluka in Kolhapur district | दहा गुंठ्यांचाही आता नकाशा मिळणार, आधारसारखा यूएलपीएन नंबर होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' तालुक्यापासून सुरुवात

दहा गुंठ्यांचाही आता नकाशा मिळणार, आधारसारखा यूएलपीएन नंबर होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' तालुक्यापासून सुरुवात

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : शेतजमीन पोट हिस्सा मोजणी व नकाशा अद्ययावतीकरणासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याची निवड भूमी अभिलेख प्रशासनाने केली आहे. यांतर्गत पुढील आठवड्यात गडहिंग्लजमधील कसबा नूल, निलजी, मुत्नाळ, हिटणी, खणदाळ या गावांत प्रत्यक्ष शेत जमिनींची मोफत मोजणी करून कमीत कमी दहा गुंठे बागायती आणि २० गुंठे जिरायत जमिनीचे पोटहिस्से आणि नकाशे तयार करण्यात येणार आहे.

प्रत्येक हिश्शाला आधारसारखा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक (यूएलपीएन) मिळणार आहे. यातून जेवढा नकाशा तेवढाच सातबारा तयार करण्यात येणार आहे. परिणामी शेतीच्या हद्दीवरून, क्षेत्रावरूनचे वाद संपणार आहेत, असे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे.

नकाशा आणि सातबाऱ्यातील क्षेत्रात तफावत असल्याने केंद्र आणि राज्याच्या शेतीसंबंधीच्या योजना राबवताना अडचणी येत आहेत. यामुळे केंद्र शासनाच्या विशेष साहाय्य योजनेंतर्गत पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक पोटहिश्शाला यूएलपीएन नंबर दिला जाणार आहे. सध्याचा गट, सर्व्हे नंबर नाहीसा हा युनिक नंबरच जमिनीची ओळख बनणार आहे. जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. गडहिंग्लजचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शेत जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी होणार आहे.

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निश्चित होणार...

पोट हिस्सा मोजणीवेळी संबंधित गावातील सरकारी, गायरान, स्मशानभूमीच्या जमिनीचीही मोजणी होणार आहे. या जमिनीवरील अतिक्रमणही निश्चित करण्यात येणार आहे. याचा अहवाल भूमी अभिलेख प्रशासन महसूल प्रशासनास देणार आहे.

मोजणीत पाच सेमीपर्यंत अचूकता..

अत्याधुनिक रोव्हरच्या साहाय्याने मोजणी केली जाणार असल्याने क्षितीज समांतरापासून पाच सेमीपर्यंतची अचूकता येणार आहे. उभी अचूकता दहा सेमीपेक्षा कमी असणार आहे. यामुळे नकाशा आणि सातबारातील क्षेत्राचा मेळ बसवणे शक्य होणार आहे.

प्रत्यक्ष मोजणीचे काम असे होणार.....

  • पोटहिस्सा मोजणीच्या दिनांकास सातबारामधील नावानुसार पोटहिस्सा मोजणी होणार.
  • जाग्यावरील सर्व्हे नंबर, गटनंबरचे मूळ कायम दगड आणि जमिनीसंबंधी डिजिटल डेटा विचारात घेण्यात येणार आहे.
  • नव्याने तयार झालेला पोटहिस्सा मूळ सर्व्हे, गटनंबरच्या नकाशावर जीआएस प्लाटफार्मवर सुपर इम्पोजेशन तयार होणार
  • जमीन मालकीवरून न्यायालयात वाद असेल, तर मोजणी होणार नाही.
  • पोटहिस्सा मोजणीवेळी वाद, क्षेत्रात घोळ, हद्दीत फेरफार असेल तर सक्षम अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देणार.

शेतजमिनीचा मोफत पोटहिस्सा मोजणी, नकाशा अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात याला गडहिंग्लज तालुक्यातून पुढील आठवड्यात सुरुवात होईल. जमीनधारकांनी प्रत्यक्ष हजर राहून जमिनीची वहिवाट, जुन्या हद्दी, ढेपण, दगड दाखवाव्यात. - शिवाजीराव भोसले, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, कोल्हापूर.

Web Title : भूमि मानचित्रण पहल: दस गुंठा के लिए यूएलपीएन, कोल्हापुर पायलट

Web Summary : कोल्हापुर के गडहिंग्लज में मुफ्त भूमि मानचित्रण शुरू। प्रत्येक प्लॉट को आधार की तरह एक अद्वितीय यूएलपीएन मिलेगा। इससे भूमि विवादों का समाधान होगा और रिकॉर्ड संरेखित होंगे, जिससे सरकारी योजनाओं को मदद मिलेगी। सटीक माप से अतिक्रमण रुकेगा।

Web Title : Land Mapping Initiative: ULPIN for Ten Gunthas, Kolhapur Pilot

Web Summary : Kolhapur's Gadhinglaj starts free land mapping. Each plot gets a unique ULPIN, like Aadhaar. This resolves land disputes and aligns records, aiding government schemes. Accurate measurements ensure precise maps, preventing encroachment.