शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅट न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: July 27, 2014 01:06 IST

व्यापारीवर्गांत एकच खळबळ

कोल्हापूर : विक्रेत्यांनी कर भरला नसल्यामुळे त्याला जबाबदार धरत शहरातील काही व्यापाऱ्यांना व्हॅट भरण्याच्या नोटिसा विक्रीकर व आयकर विभागाने पाठविल्या आहेत. सुमारे २०० कोटींचा कर भरण्याच्या नोटिसीमुळे काही व्यापारी दिवाळखोरीत निघण्याची भीती व्यक्तहोत असून व्यापारीवर्गांत एकच खळबळ उडाली आहे. तथापि, या नोटिसांना घाबरुन न जाता व्यापाऱ्यांनी पुढे येऊन न्यायालयीन लढा लढण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील असंख्य व्यापाऱ्यांना विक्रीकर व आयकर विभागाच्या नोटिसा येत आहेत. व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्हॅट भरला; परंतु नंतर तो विक्रेत्यांनी भरला नसल्याची बाब विक्रीकर विभागाच्या निदर्शनास आली. सन २००६ पासून हा प्रकार होत आला आहे. काही राजकीय शक्ती आणि दोन नंबरमध्ये व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांच्या साखळीचा यात मोठा संबंध आहे. विक्रेत्यांनी व्हॅट भरला नाही याला थेट जबाबदार धरत काही व्यापाऱ्यांनाच नोटिसा पाठविण्याच्या या अजब प्रकाराने व्यापारी हबकून गेले आहेत. एकेका व्यापाऱ्याना १ कोटीपासून ४ कोटी थकबाकीसह कर भरण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत. ज्यांनी बोगसगिरी केली त्यांच्याकडूनच व्हॅट वसूल करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. याबाबत आज, शनिवारी व्यापारी व उद्योजक महासंघाच्या बैठकीत व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांना अशा नोटिसा आल्या आहेत त्यांनी न्यायालयीन लढाईसाठी सज्ज राहावे. ‘फाम’तर्फे न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बैठकीला अमर क्षीरसागर, प्रवीण शाह, विनोद कटारिया, बाबा महाडिक, सुरेश गायकवाड, संजय रामचंदाणी, अमोल नष्टे, सचिन शहा, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)