शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानगी प्रणालीबाबत सूचना

By admin | Updated: July 29, 2014 00:46 IST

आयुक्तांची सकारात्मक भूमिका

कोल्हापूर : महापालिका बांधकाम परवानगी प्रणाली सुलभ होण्यासाठी ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स’च्या अभ्यास गटाने नुकतीच महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अभ्यास गटाने सुचविलेल्या सूचना तत्त्वत: आयुक्तांनी मान्य केल्या, तर उर्वरित मुद्द्यांवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे असोसिएशनच्या अभ्यास गटाला आश्वासन दिले.कोल्हापूर महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत काही अडचणीच्या मुद्द्यांमुळे बांधकाम परवानगी प्रणाली क्लिष्ट झाली आहे. काळानुसार या नियमावलीत बदल होणे आवश्यक असल्याने असोसिएशनच्या एका अभ्यास गटाने पार्किंग, ग्रीन बिल्डिंगबाबतचे नियम, रेखांकनामध्ये एस.टी.पी. प्लँट, वेगवेगळ्या प्रकारच्या मंजुरीसाठीचे शुल्क, काही नवीन नियम करण्याबाबतच्या सूचना, बांधकाम परवानगीतील विविध टप्पे, इमारतींना अग्निशमनच्या आवश्यक सुविधा, भोगवटा प्रमाणपत्रासाठी सवलत योजना अशा विविध प्रकारच्या नियमावलीमधील मुद्द्यांवर आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी आयुक्त बिदरी यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. लेआऊटमधील एस.टी.पी. प्लँट व अग्निशमन सुविधेबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी कार्यशाळाही आयोजित केली जावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे, उपाध्यक्ष सुधीर राऊत, सचिव मिलिंद नाईक, मोहन वायचळ, बलराम महाजन, प्रवीण पाटील, रवी पाटील, सचिन घाटगे, सुरत जाधव, शिवाजी पाटील, प्रशांत कापडी, विजय कोराणे, संग्राम शिंदे, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी) 

चर्चेतील मुद्दे-पार्किंग : इमारतीच्या उंचीमधून पार्किंगची उंची कमी करण्यात यावी. मेकॅनिकल पार्किंगसाठी उंची पाच मीटर करण्यात यावी. तळघर पार्किंग हद्दीच्या रेषेपासून १.५ मीटर ठेवण्यात यावे. -ग्रीन बिल्डिंग : पर्यावरणाचा विचार करून आय.जी.बी.सी.च्या नियमावलीप्रमाणे ग्रीन बिल्डिंगची संकल्पना राबवावी. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयोग होईल. -एस.टी.पी.पी. प्लँट : सिंगल प्लॉट लेआऊट करताना इमारत बांधकाम परवान्याबरोबर एस.टी.पी. प्लँटला मंजुरी देण्यात यावी. इतर ठिकाणच्या एस.टी.पी. प्लँटबाबत माहिती गोळा करूनच अंमलबजावणी करावी. -बांधकाम परवाना शुल्क : नवीन इमारत बांधकाम परवान्यासाठीचे शुल्क भरमसाट वाढलेले आहे. ५००० चौरस फुटांपर्यंत लहान बांधकामांचे शुल्क शिथिल करण्यात यावे. जिना व लिफ्टसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्यात यावे.-कंप्लिशन सर्टिफिकेट : शहरामध्ये ५० ते ६० टक्के इमारती या रीतसर कंप्लिशन न घेता वापरल्या जात आहेत. अशा इमारतींसाठी सवलत योजना राबवून त्यांना रीतसर कंप्लिशन देण्यात यावे.-अग्निशमन सुविधा : प्रत्येक नवीन इमारतीसाठी अग्निशमनची सुविधा असणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने नियमावलीचा अभ्यास करून छोट्या इमारतींसाठी अग्निशमनचे नियम शिथिल करावेत.