शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

फोनवर नव्हे, आता बेबसाईटवर सट्टा !,सामने दुबईत, सट्टा कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:14 PM

IPL , Satta Bazar, police, kolhapurnews आयपीएलचे क्रिकेट सामने दुबईत, पण सट्टा पश्चिम महाराष्ट्रात अशी अवस्था निर्माण झाली आहे. क्रिकेट सामन्यावरील सत्रावर सध्या कोल्हापूर, सांगलीमध्ये सट्टाबाजार जोमात सुरू आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींनी पूर्वीची फोनवर बुकिंगची पद्धत बदलून आता वेबसाईटवर सट्टा लावण्यासाठी ग्राहकांना मोकळे रान करून दिल्याची माहिती पुढे आली.

ठळक मुद्दे फोनवर नव्हे, आता बेबसाईटवर सट्टा !,सामने दुबईत, सट्टा कोल्हापुरातपोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींची नवी पद्धत

तानाजी पोवारकोल्हापूर : आयपीएलचे क्रिकेट सामने दुबईत, पण सट्टा पश्चिम महाराष्ट्रात अशी अवस्था निर्माण झाली आहे. क्रिकेट सामन्यावरील सत्रावर सध्या कोल्हापूर, सांगलीमध्ये सट्टाबाजार जोमात सुरू आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींनी पूर्वीची फोनवर बुकिंगची पद्धत बदलून आता वेबसाईटवर सट्टा लावण्यासाठी ग्राहकांना मोकळे रान करून दिल्याची माहिती पुढे आली.क्रिकेट सामने म्हटले की विशेषत: सट्टाबाजार जोमात असतो. सध्या दुबईत आयपीएल सामने सुरू असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सट्टाबाजारात बुकींना उधाण आले. कोल्हापूर शहर व गांधीनगर येथे बुकी मोठ्या प्रमाणात निर्माण झाले.

दुबईत क्रिकेट सामने सुरू असले तरीही कोल्हापुरात करोडो रुपयांचा सट्टाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. कोल्हापुरात तनवाणी हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सट्टाबाजारावर पुन्हा प्रकाश पडला. क्रिकेट सामन्यातील पाच ते सहा सत्रांवर अगर ओव्हर, स्कोअरवर हे बेटिंग घेतले जाते. या सट्टाबाजारात १० टक्के कमिशनवर बुकी काम करीत आहेत.पूर्वी फोनवर बेटिंग घेतले जात होते. आता पोलिसांना चकवा देण्यासाठी बुकींनी आपली पद्धत बदलली. वेबसाईटवर डिझाईन करून व प्रत्येक ग्राहकाला युजर आयडी व पासवर्ड देऊन सट्टा लावण्याची सोय केली आहे. ग्राहक घरबसल्या वेबबाईटवर सट्टा लावू लावतात. सेंटरवर पोलिसांचा छापा पडल्यास बुकीचालक एक क्लिक करून सर्व माहितीही डिलिट करतात.गांधीनगरात रॉबिन, दुधाळीत एनओ, तर मंगळवार पेठेत डीएमसट्टाबाजारात कमिशनवर मोठा फायदा होत असल्याने बुकींचीही संख्या वाढली. पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर व गांधीनगर भागात अवघे सात ते आठ बुकीचालक होते. आता ही संख्या १०० वर पोहोचली. प्रत्येक बुकी हा कोडवर्ड नावाने प्रसिद्ध आहे. गांधीनगरात रॉबिन, शिवन, बबलू तसेच कोल्हापुरात मंगळवार पेठेतील संतोष व एमडी दोघे पार्टनर, दुधाळी परिसरात एनओ तर शाहूपुरीत विल्सन हे बुकीचालक आहेत.मुंबईत गॉडफादरकोल्हापूरच्या परिसरात बुकींची संख्या मोठी असली तरीही प्रत्येक बुकी आपल्या कुवतीप्रमाणे सट्टा स्वीकारतो. या सर्वांचा गॉडफादर मुंबईत बसून सर्व व्यवहार पाहत असल्याचे समजते.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरIPLआयपीएलSatta Bazarसट्टा बाजार