कोल्हापूर : भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांचा माझ्याशी नियमित संपर्क आहे. काही जागांवरून जरी चर्चा सुरू असली तरी ती सकारात्मक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत काही सुरू असलेल्या चर्चा या अफवा आहेत, ‘त्या’ राष्ट्रवादीत कोणी शक्तिशाली राहिलेले नाही. त्यामुळे या कोणत्याही चर्चेत अर्थ नाही असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.मुश्रीफ हे सकाळी कोल्हापुरात आले आणि कागलमध्ये त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या भाजप, शिंदेसेेना समन्वय समितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची समन्वय समिती, राष्ट्रवादी (शरद पवार)शी होणारी युतीची चर्चा याबाबत मुश्रीफ यांनी सविस्तर भूमिका मांडली.
वाचा: जनसुराज्य मैदानात उतरताच अनेक बंडखोरांचे डोळे लकाकलेते म्हणाले, नागपूर आणि कोल्हापूर येथे महापालिकेबाबत झालेल्या महायुतीच्या बैठकांमध्ये मी होतो. बुधवारी पुण्यातील बैठकीसाठी मी व्हीसीद्वारे सहभागी झालो होतो. काही जागांवर आमची चर्चा सुरू आहे. परंतु ती सकारात्मक आहे. त्यामुळे मला कोणतीही अडचण वाटत नाही.
वाचा : महायुतीचे दक्षिणेत मिटलंय, उत्तरेत पेटलंय; नेत्यांची आज पुन्हा बैठक
राष्ट्रवादीच्या समन्वय समितीबाबत काय असे विचारले असता, ही समिती प्रदेशकडून जाहीर केली जाईल असे ते म्हणाले. आमदार विनय कोरे हे भाजपचे सहयाेगी आहेत. त्यामुळे इतक्या उशिरा त्यांनी या प्रक्रियेत कसा प्रवेश केला याचे मलाही आश्चर्य वाटले असे ते म्हणाले.
Web Summary : Hasan Mushrif dismisses NCP unity talks as baseless, citing ongoing BJP-Shinde Sena alliance discussions. He highlights positive coordination talks and expresses surprise at Vinay Kore's late entry into the process.
Web Summary : हसन मुश्रीफ ने एनसीपी एकता वार्ता को निराधार बताया, भाजपा-शिंदे सेना गठबंधन पर जोर दिया। उन्होंने सकारात्मक समन्वय वार्ता पर प्रकाश डाला और विनय कोरे की प्रक्रिया में देर से प्रवेश पर आश्चर्य व्यक्त किया।