शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

लॅब मंजुरीचा नाही पत्ता, खरेदीसाठी मात्र आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:11 IST

विश्वास पाटील। कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात स्थापन होणाऱ्या कोविड प्रयोगशाळेसाठी शासनाकडून अजून मंजुरीच मिळाली नसताना तब्बल ४३ लाख रुपयांची ...

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ : कोविड लॅबसाठी ४३ लाखांची साधने खरेदीची लगीनघाई व्यवस्थापन समितीने रोखली

विश्वास पाटील।कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात स्थापन होणाऱ्या कोविड प्रयोगशाळेसाठी शासनाकडून अजून मंजुरीच मिळाली नसताना तब्बल ४३ लाख रुपयांची साधने खरेदीचा घाट व्यवस्थापन समितीने हरकत घेतल्याने तूर्त बारगळला. कुलगुरू व प्रकुलगुरू यांची मुदत १७ जूनला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रयोगशाळेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची प्रक्रियाही सुरू न करता उपकरणे खरेदीची लगीनघाई विद्यापीठात सुरू होती.

कोविड विषाणूच्या आडून विद्यापीठातील ही अत्याधुनिक हाय एंड लॅबोरेटरी स्थापन करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. सुरुवातीला वनस्पतीशास्त्र शाखेच्या प्राध्यापकाने ही प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली होती. त्यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. तोपर्यंत अन्य विद्यापीठांनी शासनाकडून अनुदान मिळवून प्रयोगशाळा सुरू केल्या. राज्यपालांनी एप्रिलमध्ये घेतलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत आपत्कालीन निधीतून कोविडच्या निमित्ताने अशी प्रयोगशाळा सुरू करावी असे सुचविले. त्यानंतर या लॅबने पुन्हा उचल खाल्ली. या लॅबचा प्रस्ताव प्राध्यापिकेस करायला सांगितला. त्यासाठी समिती स्थापन केली.

कोविडवर संशोधन निबंध प्रकाशित करणाºया प्राध्यापकास सदस्य बनविले. कुणाचा आक्षेप नको म्हणून मूळ प्रस्ताव सादर करणाºया प्राध्यापकांसही या समितीत घेतले. महात्मा फुले आरोग्य योजनेत गैरप्रकार केल्याचा आक्षेप असलेल्या महाविद्यालयाच्या डॉक्टरचे सहकार्याबाबत सहमती पत्र घेतले.

अशा प्रयोगशाळेपासून १०० मीटर अंतरावर अन्य इमारत असू नये असे प्रस्तावातच नमूद असताना ५० ते ८० मीटरवर असलेल्या विद्यापीठाच्या सामायिक सुविधा केंद्र (सीएफसी) इमारतीत ही प्रयोगशाळा उभारायची असे सांगत थेट प्रयोगशाळेसाठी लागणारी उपकरणे खरेदीची प्रक्रियाच सुरू केली. जे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले होते, त्यातील पहिल्या प्रस्तावात प्रयोगशाळा उपकरणांसाठी ६५ लाख व नंतरच्या प्रस्तावात ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता.

एकाही अटीची पूर्तता न करता उपकरण खरेदीचा विषय व्यवस्थापन समितीसमोर रेटण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु १९ मे रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शासनाच्या मंजुरीनंतरच अशा प्रकारच्या खरेदीचा विषय अधिकार मंडळासमोर ठेवावा असे सांगून हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे.

व्वा..सामाजिक उत्तरदायित्व..आपत्कालीन निधीच्या व्याजाची रक्कम खर्च करण्यास शासनाची मंजुरी असते; परंतु या प्रकरणात राज्यपालांच्या बैठकीतील कार्यवृत्तांताचा अहवाल देत थेट आपत्कालीन निधीच खर्च करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होता.

कोल्हापुरात सध्या राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयांत ही लॅब सुरू झाली असताना सामाजिक उत्तरदायित्वाचे भले मोठे कारण देऊन ही लॅब सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते.थुंकी तपासणे हे विद्यापीठाचे काम नाही, तुम्ही कोरोना विषाणूवर लस शोधून काढणारे संशोधन करा, अशीही अपेक्षा व्यक्त झाली.

टॅग्स :universityविद्यापीठCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस