शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकात प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोगनोळी येथील महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या टोलनाका या ठिकाणी तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासन व निपाणी तालुका प्रशासन यांच्यावतीने कोगनोळी टोलनाका या ठिकाणी कोविड तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली असून, महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करून व कोविड प्रमाणपत्र पाहूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. पोलीस प्रशासन, महसूल विभागातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांच्यावतीने थर्मल स्कॅनिंग करून संसर्गजन्य आजाराची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींनाच कर्नाटकात प्रवेश दिला जाईल. येत्या ४८ ते ७२ तासांमध्ये कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने काढून घेणे बंधनकारक आहे, असे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यक्तींना कर्नाटकातील प्रवेशास मज्जाव करण्यात येणार असल्याचे निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.

चौकट :

उद्यापासून प्रमाणपत्र नाही तर प्रवेश नाही

सध्या कोविड प्रमाणपत्राची सक्ती केली नसली तरी येत्या ४८ ते ७२ तासांमध्ये प्रमाणपत्र काढून घेऊनच कर्नाटकात प्रवेश करावा. त्या संदर्भातील जागृती डिजिटल फलकाद्वारे याठिकाणी करण्यात आली आहे. मोटारसायकलपासून बसपर्यंत सर्वच वाहनांचे थर्मल स्कॅनिंग करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. जर काही कोविडसदृश लक्षणे आढळली, तर त्यांना परत पाठविण्यात येईल.

फोटो ओळ : महाराष्ट्रातील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक सरकारने कोगनोळी टोलनाका या ठिकाणी प्रवाशांची तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.

छाया : बाबासो हळिज्वाळे