Kolhapur News: गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी नववा संशयित अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:36 IST2023-01-31T12:35:14+5:302023-01-31T12:36:07+5:30
संशयित डॉक्टर असून त्याचा सदलगे येथे दवाखाना आहे

Kolhapur News: गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी नववा संशयित अटकेत
गारगोटी : बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात करण्याऱ्या टोळीतील नवव्या संशयिताला रविवारी रात्री भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉक्टर आनंद महादेव चौगले (वय ४७, मूळ रा.जनवाड, ता.चिकोडी, जि.बेळगाव, कर्नाटक. व्यवसाय-डॉक्टर सध्या रा.सदलगे, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) असे त्या संशयित डॉक्टरचे नाव आहे.
आनंद चौगुले हा बीएचएमएस आहे. त्याचा सदलगे येथे दवाखाना आहे. तो आपल्या दवाखान्यात आलेल्या गरजू गर्भवती महिलांना या टोळीकडे पाठवत असे. त्याचा या कुकर्मात सहभाग लक्षात आल्यावर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांना पोलिस कर्मचारी सोबत घेऊन सदलगा येथे पाठविण्यात आले. रविवारी रात्री आनंद चौगुले याला अटक करून गारगोटी येथे आणण्यात आले आहे.