‘चिकोत्रा’चे नववे आवर्तन २ जूनला-: पाऊस लांबण्याच्या अंदाजाचा परिणाम, पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:16 IST2019-05-21T00:16:31+5:302019-05-21T00:16:47+5:30
मान्सूनचे आगमन उशिरा होण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने चिकोत्रा पाटबंधारे विभागाने सतर्कता बाळगण्याच्यादृष्टीने नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीत धरणातून २८ मे रोजी सोडण्यात येणारे पाणी २ जूनला

‘चिकोत्रा’चे नववे आवर्तन २ जूनला-: पाऊस लांबण्याच्या अंदाजाचा परिणाम, पिके धोक्यात
दत्ता पाटील ।
म्हाकवे : मान्सूनचे आगमन उशिरा होण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने चिकोत्रा पाटबंधारे विभागाने सतर्कता बाळगण्याच्यादृष्टीने नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीत धरणातून २८ मे रोजी सोडण्यात येणारे पाणी २ जूनला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीवर २ जून ते ११ जूनपर्यंत उपसाबंदी करण्यात आली आहे. तसेच शेतीसाठी हे शेवटचे पाणी असून, पावसाचे आगमन लांबले तर बंधाऱ्यांचे सर्व बरगे काढून केवळ पिण्यासाठी नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.
चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील पिण्यासह शेतीच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून असणारे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरण केवळ दीड टीएमसी क्षमतेचे आहे. तरीही यंदा जादा पावसाच्या नोंदीमुळे पाच ते सहा वर्षांनंतर हे भरले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत प्रशासनावर ताण आलेला नाही. यंदा नोव्हेंबरपासून एप्रिलअखेर ८ आवर्र्तने देण्यात आली आहेत. तर आगामी ९ वे आवर्तन देण्याचे नियोजन सुरू आहे.सध्या, धरणात ५०० एमसीएफटी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी आगामी आवतर्नासाठी १५० एमसीएफटी पाणी लागणार आहे.
अनुभवामुळे सुधारणा
गतवेळी धरणात अवघा ६६ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे सात आवर्तनाचे नियोजन केले होते. मात्र, सुरुवातीच्या तीन ते चार आवर्तनावेळी मोठ्या प्रमाणावर उपसाबंदी झुगारून अवैध पाणी उपसा केला. त्यामुळे चिकोत्रा खोºयात पाणीबाणी निर्माण झाली होती. त्यामुळे २८ मे ते ६ जूनऐवजी २ जून ते ११ जून असा बदल केला आहे.
उपसाबंदीसाठी पोलीस बंदोबस्त
उन्हाळ्यात शेवटच्या बेळुंकी बंधाºयापर्यत पिण्याचे पाणी लवकर पोहोचविण्यासाठी काटेकोर उपसाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे यावेळी उपसाबंदी काळात पाणी उपसा करणाऱ्यांना चाप लागणार आहे.
पाऊस लांबला तर पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे आवर्तन सहा दिवस उशिरा सोडण्याचे नियोजन केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे यावेळी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे गृहीत धरून उपसाबंदी काटेकोर ठेवण्याचेही नियोजन केले आहे.
- उत्तमकुमार कापसे, उपअभियंता, वेदगंगा-चिकोत्रा, गारगोटी