जी. गुरुप्रसाद यांच्यासह कोल्हापूर वनविभागातील नऊजणांना पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:42 IST2026-04-01T17:42:23+5:302026-04-01T17:42:38+5:30

कोल्हापूर : वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच त्यांचे व्यवस्थापन यासह वन उत्पादकता जतन आणि वाढ आदींसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ...

Nine people from Kolhapur Forest Department including G Guruprasad received medals | जी. गुरुप्रसाद यांच्यासह कोल्हापूर वनविभागातील नऊजणांना पदके

जी. गुरुप्रसाद यांच्यासह कोल्हापूर वनविभागातील नऊजणांना पदके

कोल्हापूर : वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच त्यांचे व्यवस्थापन यासह वन उत्पादकता जतन आणि वाढ आदींसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील वनविभागातील ५९ अधिकाऱ्यांना पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तत्कालीन उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्यासह सध्या कार्यरत तसेच तत्कालीन अशा एकूण नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सन २०२३-२४ या वर्षाकरिता वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनपाल सुरेश उपरे यांना सुवर्णपदक, तर वनरक्षक गणेश भोसले आणि अक्षय चौगुले यांना रौप्यपदक जाहीर झाले आहे. वन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याबद्दल वनरक्षक अरविंद मांडवकर आणि तत्कालीन सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांना सुवर्णपदक जाहीर झाले.

२०२४-२५ या वर्षासाठी वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी उत्कृष्ट काम केलेल्या सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे व वनपाल राजाराम खोत यांना सुवर्ण, तर वन्यजीव व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करणाऱ्या वनपाल राजाराम काशीद यांना सुवर्णपदक जाहीर झाले आहे. 

जी. गुरुप्रसाद यांनी उत्कृष्ट प्रशासन, अविरत कष्ट, सखोल ज्ञान यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकाळात कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल क्षेत्राचे जतन व संवर्धन केलेले आहे. यापूर्वी वनवणव्यामुळे जिल्ह्यातील एक ते दीड हजार हेक्टर क्षेत्र नुकसानीत येत होते, त्यांनी नियोजनपूर्वक घट करून ते फक्त ४५० हेक्टर एवढे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जंगल क्षेत्राची वाढ होऊन लाखो वन्यजीवांना जीवदान मिळालेले आहे.

Web Title : जी. गुरुप्रसाद समेत कोल्हापुर वन विभाग के नौ सदस्य पदक से सम्मानित

Web Summary : जी. गुरुप्रसाद सहित कोल्हापुर के नौ वन अधिकारियों को वन और वन्यजीव संरक्षण में उत्कृष्ट कार्य के लिए पदक मिले। पुरस्कार सुरक्षा, प्रबंधन और उत्पादकता के प्रयासों को मान्यता देते हैं। गुरुप्रसाद ने जंगल की आग से होने वाले नुकसान को काफी कम किया, जिससे वन्यजीवों को लाभ हुआ।

Web Title : Kolhapur Forest Department's Nine Members, Including G. Guruprasad, Honored with Medals

Web Summary : Nine Kolhapur forest officials, including G. Guruprasad, received medals for outstanding work in forest and wildlife conservation. Awards recognized efforts in protection, management, and productivity. Guruprasad significantly reduced forest fire damage, benefiting wildlife.