Kolhapur News: गुडवळेजवळ आढळला साडे नऊ फूट लांबीचा किंग कोब्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:17 IST2025-12-30T13:16:08+5:302025-12-30T13:17:31+5:30
पकडून सुरक्षित जंगलात सोडला

Kolhapur News: गुडवळेजवळ आढळला साडे नऊ फूट लांबीचा किंग कोब्रा
चंदगड : गुडवळे येथे मुख्य रस्त्याजवळ तब्बल साडे नऊ फूट लांबीचा किंग कोब्रा चंदगड वनविभाग व वन्यजीव रक्षकांमार्फत पकडून सुरक्षित जंगलात सोडला.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मोटणवाडी - पारगड रस्त्याला पर्यटकांची गर्दी होती. त्यातच गुडवळे गावच्या हद्दीमध्ये मुख्य रस्त्यावर काही पर्यटकांना नागराज (किंग कोब्रा) जातीचा साप आढळून आल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांनी तिथे गर्दी केली होती.
त्याच वेळी तिथून जाणारे वनविभागाचे कर्मचारी शंकर तेरवणकर यांना ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी साप व पर्यटक या दोघांच्या सुरक्षिततेचा विचार लक्षात घेऊन पर्यटकांना तिथून बाजूला करून वरिष्ठांना कळवले. त्यावेळी तिलारीनगर येथे वन्यजीव जनजागृती, तसेच पर्यटकांना निसर्ग मार्गदर्शन करणारे, वन्यजीव अभ्यासक विकास माने यांना पाचारण करण्यात आले. यावेळी माने हे तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले व वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वर्षदा पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास माने व शंकर तेरवणकर यांनी किंग कोब्रा सापाला पकडून चंदगड वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगलात मुक्त केले.