शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

‘एचआयव्ही’ ची स्वेच्छेने तपासणी करण्यात पुढे, कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:20 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षांत ‘एचआयव्ही’ तपासणी ‘स्वेच्छेने’ करून घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते; तर मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. यंदा ‘नो युवर स्टेटस’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘जागतिक एड्स दिन’ आज, शनिवारी साजरा होत आहे.

ठळक मुद्दे‘एचआयव्ही’ ची स्वेच्छेने तपासणी करण्यात पुढे, कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र एडस मृत्यूचे प्रमाणही घटले

गणेश शिंदे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षांत ‘एचआयव्ही’ तपासणी ‘स्वेच्छेने’ करून घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते; तर मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. यंदा ‘नो युवर स्टेटस’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘जागतिक एड्स दिन’ आज, शनिवारी साजरा होत आहे.स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्याकडून एड्स्बद्दल सातत्याने होणारी जनजागृती आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने राबविलेले विविध उपक्रम यांमुळे जिल्ह्यातील एडस संसर्गित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. जिल्हा एचआयव्ही मुक्तीकडे पावले टाकत असल्याचे आशादायक चित्र पाहावयास मिळत आहे.

एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील व जिल्हा कार्यक्रमाधिकारी दीपा शिपूरकर यांनी याबाबतची माहिती दिली.जिल्ह्यातील समुपदेशन तपासणी केंद्रात (आयसीटीसी) २००७ ला ३८ हजार ४०६ लाभार्थ्यांपैकी ३८६६ एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्यावेळी हे प्रमाण १० टक्के प्रमाण होते व २१० रुग्णांचा मृत्यू झाला होता.

यावर्षी ६५ हजार ४७६ लाभार्थ्यांची तपासणी केली असता ५५५ पॉझिटिव्ह होते. आता ते प्रमाण ०.८५ टक्के इतके कमी झाले आहे; पण मृत्यू २५९ झाले. आज असे दिसून येते की, एचआयव्ही तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह होणाºयांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे.मोहिमेअंतर्गत २००७ ला ३६ हजार २४२ गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३९ स्त्रिया एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या; हे प्रमाण ०.४ टक्क होते. २०१८ ला ४१ हजार २१७ स्त्रियांची तपासणी केल्यावर त्यामध्ये केवळ १७ स्त्रिया पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हे प्रमाण ०.०४ टक्के इतके कमी झाले. त्यामुळे साहजिकच, बाळांना एचआयव्ही विषाणूविरोधी लस दिल्यामुळे बाळांचे मृत्यू प्रमाण घटले आहे.

ही आहेत कारणे...सधनता, स्थलांतरित कामगार, पर्यटकांचे प्रमाण, सीमेलगतची भौगोलिक परिस्थिती व केंद्रित लक्ष्यगट ही एचआयव्ही बाधिताची कारणे आहेत. जिल्ह्यामध्ये २६ आयसीटीसी केंद्रे असून या ठिकाणी मोफत समुपदेशन व चाचणी केली जाते.याचबरोबर ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४१३ उपकेंद्रे व साधारणत: १०६ पीपीपी म्हणजे खासगी दवाखाने व प्रयोगशाळा या ठिकाणी एचआयव्हीची तपासणी केली जाते. या सर्वांवर जिल्हा एड्स पथकाद्वारे नियंत्रण राखले जाते. 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर