शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वाढदिवस अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावरच, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 12:07 IST

'वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे विरोधक जागरूक होतात'

गडहिंग्लज : महाराष्ट्राच्या विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाहिले आहे. त्यासाठीच त्यांनी भाकरी परतवली आहे. परंतु, इकडे भाकरी परतणार नाही याची काळजी घेवूया. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत व चंदगडमध्ये लालदिव्याची गाडी यावी यासाठी मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असे आवाहन करतानाच अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत आपला पुढील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्धार आमदार राजेश पाटील यांनी बुधवारी (१४) केला.महागाव येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, रामाप्पा करिगार यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटील म्हणाले, वडील स्व. नरसिंगराव, कुपेकर व मंडलिकांच्या शिकवणीतून घडलो. निष्ठावंत कार्यकर्ते व पुरोगामी मतदारांमुळेच आमदार झालो. अजितदादा, जयंत पाटील यांचे पाठबळ आणि हसन मुश्रीफ यांची साथ यामुळेच कोट्यवधींची कामे झाली. यापुढेही चांगले तेच करेन. कुणाचे वाईट करण्याचे पाप करणार नाही.रेडेकर म्हणाल्या, आमदार पाटील हे स्व. मंडलिक व नरसिंगराव यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. मुकुंद देसाई म्हणाले, आमदार पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळेच कुपेकरांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांची फळी अधिक मजबूत झाली.यावेळी शिवानंद हुंबरवाडी, अल्बर्ट डिसोझा, अमर चव्हाण, संतोष पाटील, शिवप्रसाद तेली, रघुनाथ पाटील, प्रकाश पाटील, राजेश औरनाळकर, बाळू चौगुले, संगीता पाटील यांचीही मनोगते झाली.कार्यक्रमास भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, मुन्नासोा नाईकवाडे, लक्ष्मण तोडकर, बाळकृष्ण परीट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अभय देसाई यांनी आभार मानले.

आमदार पाटील म्हणाले...!- वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे विरोधक जागरूक होतात. वडील नरसिंगराव पाटील यांची एकसष्टी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात साजरी केली. परंतु, दगाफटक्यामुळेच पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दिवंगत आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आणि आपला वाढदिवस एकाच दिवशी येतो. म्हणूनच वाढदिवस साजरा करू नये, अशीच आपली भावना आहे. परंतु, गडहिंग्लजकरांच्या प्रेमामुळेच सलग दुसऱ्यावर्षी वाढदिवसाला यावे लागले.- नव्या सरकारच्या स्थगितीमुळे राज्यातील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल. महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करावे, जातीयवादी शक्तींना जागा दाखवावी. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री