शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हळद काढायला माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताचा हल्ला, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:11 IST

तातडीने उपचारासाठी दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला

हलकर्णी : आठवडाभरापूर्वी लग्न होऊन हळद काढण्यासाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताने हल्ला करून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार हलकर्णी येथे घडला. या घटनेत नीलावती रामचंद्र व्हसकोटी (वय २९) ही गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, निलावतीचे लग्न आठवडाभरापूर्वी झाले होते. ती हळद काढण्यासाठी माहेरी चंदनकुड (व्हसकोटी मळा) येथे शनिवारी आली होती. ती जेवणापूर्वी घरासमोर असलेल्या शौचालयाजवळ आली असता अज्ञाताने तिच्या डोक्यावर रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. तिच्या कानाजवळही इजा झाली आहे. नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटल येथे निलावती हिला तातडीने उपचारासाठी दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. निलावती व्हसकोटी हिने फिर्याद दिल्याने गडहिंग्लज पोलिसांत शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका हा प्रकार काय आहे, तसेच नवविवाहितेला अशा प्रकारे गंभीर जखमी करण्याचे काय कारण असावे, याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देसाई हे करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस