शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोल्हापूर विमानतळावरील नवे टर्मिनल मार्चपर्यंत खुले होणार; ज्योतिरादित्य शिंदे यांची ‘लोकमत’ व्यासपीठावर घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 10:58 AM

"ज्योतिरादित्य शिंदे हे लोकांमध्ये मिसळणारे दिलदार, खानदानी, राजकारणी व्यक्तिमत्त्व आहे."

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावरील नवीन टर्मिनल मार्चपर्यंत खुले करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी ‘लोकमत’च्या कार्यक्रमात केली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानसेवेने, तर कोल्हापूर देशातील सर्व प्रमुख शहरांशी हवाई सेवेने कसे जोडले जाईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

लोकमत’च्या वतीने ‘आयकॉन्स ऑफ कोल्हापूर’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन व समाजाच्या विविध क्षेत्रांतील ४२ आयकॉन्सचा शानदार सत्कार सोहळा येथील हॉटेल सयाजीमध्ये झाला. यावेळी शाहू छत्रपती, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे, लोकमत एडिटोरिअल बाेर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकमत’ कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष मकरंद देेशमुख उपस्थित होते.

देशातील २० कोटी लोक आता वर्षाला हवाई प्रवास करतात. ही संख्या २०३० पर्यंत ४० कोटींवर नेण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर, सिंधुदुर्गातील चिपीपासून ते बिहारमधील दरभंगासारखे विमानतळही देशाच्या विमानसेवेेशी कसे जोडले जाईल, यासाठी माझे प्रयत्न आहेत, असेही शिंदे म्हणाले.

‘लोकमत’चे कौतुक : या कार्यक्रमात ज्योतिरादित्य शिंदे यांनी  लोकमत वृत्तपत्र समूहाचे कौतुक केले. शिंदे परिवार आणि कोल्हापूरचे जुने संबंध उलगडून शिंदे म्हणाले, माझ्यासाठी हा भावुक क्षण आहे. आमच्या तीन पिढ्या दर्डा परिवाराशी जोडलेल्या आहेत. स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रयत्नांतून ‘लोकमत’ने विश्वासार्हता निर्माण करून महत्त्वाचे योगदान दिले आहे. 

शिंदे आणि मुख्यमंत्रिपद...ज्योतिरादित्य शिंदे हे लोकांमध्ये मिसळणारे दिलदार, खानदानी, राजकारणी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे शिक्षण परदेशात झाले असले तरी त्यांची भाषा मराठीच आहे. मराठी मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे  मी म्हणणार नाही; पण त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री व्हावेच; शिवाय देशाचे नेतृत्व करण्याचीही धमक त्यांच्यामध्ये आहे, असे लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहून सुचविले. त्यावर मंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातही सध्या शिंदेच मुख्यमंत्री असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेVijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमतkolhapurकोल्हापूर