कोल्हापूर : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध संशोधकांनी लावला आहे. स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन तसेच ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अभिषेक शिर्के यांच्या संयुक्त संशोधनातून ही प्रजाती समोर आली आहे.नव्या माशाचा समावेश ॲम्ब्लिसेप्स या कुळामध्ये करण्यात आला असून, या प्रजातीचे नामकरण ॲम्ब्लिसेप्स वायव्य असे केले आहे. कोंकणी व मराठीतील ‘वायव्य’ म्हणजे ‘उत्तर-पश्चिम’ असा अर्थ असून, या प्रजातीचे वास्तव्य उत्तर-पश्चिम घाटात असल्याच्या संदर्भाने हे नाव देण्यात आले आहे. तसेच पश्चिम घाटात ॲम्ब्लिसेप्स वंशाच्या आढळाची ही आतापर्यंतची सर्वांत उत्तरेकडील नोंद मानली जात आहे. हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण असल्यामुळे माशाला लपण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध होतो. दुभंगलेली शेपटी, अपूर्ण मध्यरेषा आणि शेपटीच्या मध्यभागातील शिरांमध्ये आकड्यासारख्या रचनेचा अभाव तसेच वेगळी असलेली ‘ॲडिपोज फिन’ ही वैशिष्ट्ये या माशाला त्याच्या कुळातील इतर प्रजातींपेक्षा वेगळे ठरवतात.परकीय माशांमुळे जलपरिसंस्थांना धोकागोवा आणि महाराष्ट्रातील काही मर्यादित ठिकाणांवरच या प्रजातीची नोंद आढळून आली आहे. त्यामुळे या भागांतील ओढे आणि प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले. खाणकाम, औद्योगिक सांडपाणी, मायक्रोप्लास्टिक प्रदूषण तसेच परकीय माशांच्या प्रजातींचा प्रसार यांमुळे या जलपरिसंस्थांना धोका निर्माण होत असल्याचीही त्यांनी चिंता व्यक्त केली.
या संशोधनामुळे पश्चिम घाटातील संवेदनशील अधिवासांच्या पर्यावरणीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, गोड्या पाण्यातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. -अभिषेक शिर्के, संशोधक.
Web Summary : Researchers discovered a new catfish species, *Amblyceps wayanadensis*, in the Western Ghats. Found in shallow streams, it faces threats from mining, pollution, and invasive species. Conservation is crucial for this unique ecosystem.
Web Summary : शोधकर्ताओं ने पश्चिमी घाट में शिंगला मछली (*Amblyceps wayanadensis*) की एक नई प्रजाति खोजी। उथले झरनों में पाई जाने वाली, इसे खनन, प्रदूषण और आक्रामक प्रजातियों से खतरा है। इस अनूठे पारिस्थितिकी तंत्र का संरक्षण महत्वपूर्ण है।