शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

Sangli: दारूसाठी पैसे न दिल्याने पुतण्यानेच केला वृद्धाचा खून, हल्लेखोराची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 13:34 IST

नशेत दगडाने डोके ठेचले

मांगले : मांगले (ता.शिराळा) येथील धनटेक वसाहतीत राहणाऱ्या रामचंद्र कोंडीबा सुतार (वय ६०) यांचा पुतण्यानेच दारूसाठी पैसे न दिल्याने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासाच्या दरम्यान संशयित संदीप श्यामराव सुतार यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती शिराळा पोलिसांनी दिली.राशिवडे (ता.राधानगरी, जि.कोल्हापूर) येथील रामचंद्र सुतार तीस वर्षांपूर्वी मजुरीच्या निमित्ताने मांगले येथे स्थायिक झाले. ते परिसरातील एका लाकूड वखारीत कामास होते. जवळच असलेल्या धनटेक वसाहतीमध्ये घर बांधून ते पत्नीसह राहत होते. गुरुवारी दुपारी चार वाजता मणदूर (ता.गगनबावडा) येथील त्यांच्या मेहुणीचा मुलगा संदीप हा वीस वर्षांनंतर घरी आला होता. पाहुणचार, चर्चा झाल्यानंतर दोघेही बाहेर फिरण्यास गेले, तर रामचंद्र यांच्या पत्नी इंदुबाई या वारणा रस्त्याशेजारील ढाब्यावर कामासाठी निघून गेल्या. रात्री नऊच्या सुमारास त्या काम संपवून घरी आल्यानंतर पती रामचंद्र रक्ताच्या थाराेळ्यात पडले हाेते. जवळच एक दगड पडला हाेता. खून केल्यानंतर संशयित संदीप सुतार त्यांच्याच घरात आतून कडी लावून झोपून होता.घटनेची माहिती मिळाल्यानंतर, रात्री उशिरा शिराळा पोलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक जयसिंग पाटील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, घराचा दरवाजा मोडून पाेलिसांनी हल्लेखाेरास ताब्यात घेतले. त्यावेळी तो नशेत होता. रात्री उशिरा या प्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.हल्लेखाेर संदीप हा रामचंद्र यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. त्यास नकार दिल्याने संदीपने दारूच्या नशेत दारातील दगड डोक्यात घालून त्यांचा खून केला. त्याला शुक्रवारी शिराळा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमाेर हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान, रात्री उशिरा इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस