शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:50 IST

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी,

ठळक मुद्देसामाजिक संघटनांचा पुढाकारही आवश्यक

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, यासाठी इचलकरंजीत सुरू असलेले जनआंदोलन एकाच पक्षाचे होऊन राहिले आहे. मात्र, ते खऱ्या अर्थाने जनआंदोलन होण्यासाठी त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंचगंगा नदीत पाणी असले तरी जानेवारी ते जून या कालावधीत ते दूषित होते. कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा करणाºया नळ योजनेची दाबनलिका सडल्याने तिला वारंवार गळती लागते. अशा परिस्थितीत पिण्याच्या स्वच्छ व पुरेशा पाण्यासाठी पुरवठा करणारी वारणा योजना हा एकमेव पर्याय राहतो. वारणा मंजूर करताना धरणामध्ये एक टीएमसी पाण्याचे आरक्षणही आहे.

तसेच या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीत बंधारासुद्धा बांधण्याची तरतूद आहे.अशा पार्श्वभूमीवर दानोळी अथवा वारणा काठच्या गावांना शेती सिंचन किंवा तत्सम वापराच्या पाण्यासाठी पाणी अपुरे पडणार नाही, याची खात्री शासनाकडून वारंवार देण्यात आली. विशेष म्हणजे इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणानेच वारणा नदीवरील पाणीपुरवठा योजना सुचविली आहे. जीवन प्राधिकरणामार्फतच या योजनेचा सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीतसुद्धा वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांची वारणा नळ योजनेला विरोधाची असलेली भूमिका अनाकलनीय आहे. अशा स्थितीत इचलकरंजीतून वारणा पाणी जनआंदोलन समितीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी कोपरा सभा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर ही योजना मार्गी लागावी, यासाठी दोनवेळा मोटारसायकल रॅली काढण्यातआली.

आंदोलन समितीच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देताना नगराध्यक्षांसह भाजपचे नगरसेवक व काही पदाधिकारी उपस्थित होते. वास्तविक पिण्याचे पाणी ही समस्या सोडविण्यासाठी राजकारणविरहित आंदोलन होण्याची गरज आहे. जेणेकरून शासनालाही जाग आली पाहिजे. त्यासाठी मात्र शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकजुटीची आवश्यकता आहेकोल्हापूरकरांसारखे एकजुटीचे आंदोलन हवेकाळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनची योजना असो किंवा शहरांतर्गत रस्त्यावरील टोलला टोला लावण्याचे आंदोलन असो, कोल्हापूरकरांमध्ये त्यासाठी राजकारणविरहित एकजुटीने आंदोलन होते. अशाच आंदोलनाची गरज इचलकरंजीमध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपालिकेत झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी लोकांना हाक दिली होती. त्यावेळी पाण्याची तीव्रता नसल्याने आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता उन्हाळ्यात तरी आमदारांच्या या आवाहनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष व संघटना प्रतिसाद देतात का, असाच सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPower Shutdownभारनियमन