शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची ‘वेळ’ फिरली

By admin | Updated: July 8, 2015 00:04 IST

साडेतीन वर्षांची सत्ता संपुष्टात : हसन मुश्रीफांवर नामुष्कीची वेळ; नगराध्यक्षपदी जनता दलाचे राजेश बोरगावे

गडहिंग्लज : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनता दलाने ९ विरुध्द ८ मतांनी बाजी मारुन गडहिंग्लज नगरपरिषदेतील राष्ट्रवादीची साडेतीन वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीत राजेश बोरगावे विजयी झाले. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षा सुंदराबाई बिलावर यांनी विरोधी आघाडीच्या राजेश बोरगावे यांना मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार अरुणा शिंदे यांचा ९ विरुद्ध ८ मतांनी पराभव झाला. त्यामुळे सत्तांतरानंतर नगरपरिषदेवर पुन्हा जनता दलाचा झेंडा फडकला.गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणुकीत साडेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीचा पाडाव करून राष्ट्रवादी सत्तेवर आली होती. सभागृहात राष्ट्रवादीचे ९, तर विरोधी आघाडीचे ८ नगरसेवक आहेत. त्यापैकी एक ‘जनसुराज्य’चा आहे.पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठी व त्यानंतरच्या अडीच वर्षांसाठी इतर मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे. काठावरील बहुमतामुळे वर्षापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडीप्रसंगी राष्ट्रवादीला ‘जनसुराज्य’च्या नगरसेवकाची मदत घ्यावी लागली होती.इच्छुक अन्य दोन्ही महिलांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याच्या हेतूने विद्यमान नगराध्यक्षांचा राजीनामा राष्ट्रवादीने घेतला होता, त्यामुळे ही निवडणूक झाली. मात्र, या निवडणुकीत नगरसेविका बिलावर यांनी विरोधी जनता दलाचे उमेदवार बोरगावे यांना मतदान केल्यामुळे अखेर राष्ट्रवादीवर सत्ता गमावण्याची वेळ आली. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजसह कागल, मुरगूड व पन्हाळा या चार नगरपरिषदांमध्ये आमदार मुश्रीफ यांची सत्ता होती. त्यापैकी ‘गडहिंग्लज’ नगरपरिषदेच्या सत्तेवर त्यांना पाणी सोडावे लागले. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सत्तांतरात भाग घेतल्यामुळेच त्यांना हा फटका बसल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’चा अंदाज खरा ठरला‘लोकमत’ने गडहिंग्लज नगराध्यक्ष निवडीच्या घडामोडीत सोमवारच्या अंकात ‘राष्ट्रवादीच्या बिलावर विरोधकांच्या छावणीत’, तर मंगळवारच्या अंकात ‘गडहिंग्लजमध्ये सत्तांतर शक्य’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिध्द केले होते. ‘लोकमत’ने वर्तवलेल्या अंदाजानुसार नगरपरिषदेत सत्तांतर झाले. सुमारे १२५ वर्षांच्या इतिहासात गडहिंग्लज पालिकेत पहिल्यांदाच अशा पध्दतीने सत्तांतर झाले. यामुळे ‘लोकमत’च्या रोखठोक बातम्यांची गडहिंग्लज शहरासह जिल्ह्यात विशेष चर्चा झाली. ‘लोकमत’च्या बातम्यांचे झेरॉक्सही वाटण्यात आले. नगराध्यक्ष निवडीची बातमी कळताच मंगळवारी अनेकांनी ‘लोकमत’ कार्यालयात फोन करुन अचूक अंदाजाबद्दल 'लोकमत'चे अभिनंदन केले.‘जद’ची राज्यातील एकमेव नगरपरिषदअलीकडच्या काळात जनता दलाची राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पीछेहाट झाली असली तरी गडहिंग्लज तालुक्यात पक्षाचा प्रभाव कायम आहे. गेल्या चाळीस वर्षांतील तीन निवडणुकांचा अपवाद वगळता गडहिंग्लज नगरपरिषद जनता दलाकडेच राहिली आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर नगराध्यक्ष निवडीतील ऐतिहासिक सत्तांतराने ही नगरपरिषद पुन्हा जनता दलाकडे आली आहे. जनता दलाचा झेंडा लागलेली गडहिंग्लज ही राज्यातील एकमेव नगरपरिषद ठरली आहे.माजी नगराध्यक्षांत झाली लढततीन वर्षांपूर्वीच्या जनता दल-जनसुराज्य आघाडीच्या कारकिर्दीत जनता दलाचे बोरगावे यांना दोन वर्षे व शिंदे यांना सहा महिने नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर शिंदेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यामुळे यावेळी दोन माजी नगराध्यक्षांमध्ये ही लढत झाली.