निंगाप्पा बोकडेचंदगड : तब्बल १६०० कोटींची विकासकामे करूनही विधानसभेत झालेला पराभव हा माजी आमदार राजेश पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती जाण्यामुळे तर ते परत पोरके झाल, पण अशा परिस्थितीतही न खचता त्यांनी नेटाने किल्ला लढवत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माणगाव, तुडये व कुदनूर अशा तीन जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या. त्यामुळे माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस मिळाला आहे.माजी आमदार राजेश पाटील हे माजी उपमुख्यमंत्री यांचे विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच त्यांना कधीच खाली हात पाठविले नाही. त्याच जोरावर २०२४ ची विधानसभा लढविली, पण त्यात त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. त्यामुळे माजी आमदार नाराज झाले होते. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या मनातील सल बोलूनही दाखवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यात विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्याने तर माजी आमदार कोलमडून गेले होते.अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या नेत्याला आपणच उभारी दिली पाहिजे या भावनेतून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोमाने काम सुरू केले. त्याचाच परिपाक म्हणून चारपैकी माणगाव, तुडये, कुदनूर या जिल्हा परिषदेच्या जागा व माणगाव, तुर्केवाडी, कुदनूर, तुडये व हेरे अशा पंचायत समितीच्या पाच जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. यामुळे माजी आमदार पाटील यांना तर उभारी मिळाली आहेच. त्याशिवाय कार्यकर्त्यांनाही दहा हत्तींचे बळ आले आहे.विरोधी आघाडीला शहमाजी आमदार राजेश पाटील यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे तरीही विधानसभा व चंदगड नगरपंचायतीमध्ये पराभव झाला, पण खचून न जाता त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करत आमदार शिवाजी पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील व मानसिंग खोराटे यांच्या विरोधी आघाडीला शह दिला.
टायगर अभी जिंदा हैंअनेक आघातांमुळे माजी आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले होते. तरीही त्यांनी अशा बिकट परिस्थितीतही आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीर ताकद उभी केली. त्यातून त्यांचा विजय सुकर करून ‘टायगर अभी जिंदा हैं’ हे दाखवून दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
Web Summary : Despite past setbacks, Rajesh Patil's NCP secured ZP wins in Chandgad, revitalizing party workers. He outmaneuvered opposition, proving his strength.
Web Summary : पिछली असफलताओं के बावजूद, राजेश पाटिल की एनसीपी ने चंदगढ़ में जिला परिषद चुनाव जीता, जिससे पार्टी कार्यकर्ताओं में नई जान आई। उन्होंने विरोधियों को मात दी, और अपनी ताकत साबित की।