शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP: राष्ट्रवादीला अध्यक्षासह एक जादा सभापतिपद, मंत्री मुश्रीफ यांच्याकडून फॉर्म्युला जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:53 IST

सव्वा वर्ष कालावधी : जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरसेवकांचा जंगी सत्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आमचे सर्वाधिक २० सदस्य असले तरी बहुमतांसाठी आणखी १५ सदस्य आवश्यक आहेत. भाजप, शिंदेसेना, राजेंद्र पाटील यड्रावकर गट, जनसुराज्यला सोबत घ्यावे लागेल. महापालिकेत ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार ज्याचे सर्वाधिक सदस्य त्यांना दोन पदे, त्यानुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला अध्यक्ष पदासह आणखी एक सभापतिपद मिळणार आहे. सव्वा वर्षाला नवीन पदाधिकारी निवडले जाणार असल्याचा फाॅर्म्युला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला.राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, कोल्हापूर महापालिका नगरसेवक, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या सत्कार शुक्रवारी झाला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, गावागावांत जाऊन मतदारांचे आभार मानत असताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. राज्य शासनासह जिल्हा नियोजन, जिल्हा परिषदेचा सेस फंडातून जास्तीत जास्त निधी दिला जाईल. मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या.माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘चंदगड’ मतदारसंघ चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने जनता भरडली गेली आहे. त्याचा परिपाक या निवडणुकीत दिसला. नूतन सदस्यांनी सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा.नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, राजेश पाटील व आमच्या भांडणात काही मंडळींना संधी मिळाली. यामध्ये नुकसान दोघांचे झालेच, त्याहीपेक्षा पक्षाचे मोठे झाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्हा दोघांना एकत्र आणले, चंदगड नगरपंचायतीमध्ये पहिला प्रयोग केला. आता अंगावरील गुलाल झटकून कामाला लागा. आगामी ग्रामंपचायतींसह ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’ निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करा. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी स्वागत केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष आदिल फरास यांनी आभार मानले.‘गोकुळ’ साठी कामाला लागा‘गोकुळ’ दूध संघाच्या संस्था प्रतिनिधींच्या ठरावाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल. जास्तीत जास्त ठराव गोळा करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी नूतन सदस्यांना केले.‘केडीसीसी’त आम्हाला थांबावे लागणाररिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणानुसार दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक पदावर राहता येत नाही. त्यामुळे मी, भैया मानेंसह अनेकांना थांबावे लागणार आहे. तरुण सळसळत्या रक्ताला वाव द्यावा लागेल, असे सुतोवाच करत हे धोरण येथून पुढे दहा वर्षांसाठी राबवावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP: NCP gets President post, extra chairmanship with formula.

Web Summary : NCP secures ZP President post plus another chairmanship in Kolhapur. Minister Mushrif announced a power-sharing formula for positions, changing every 1.25 years. Focus on fulfilling voter expectations, securing funds, and strengthening the party for upcoming elections like Gokul and KDCC.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफ