कोल्हापूर : अंबाबाईला साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 13:58 IST2018-04-02T13:58:08+5:302018-04-02T13:58:08+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा चौथा आणि अखेरचा टप्पा सोमवारपासून कोल्हापुरातून सुरू झाला.

ncp 4th phase hallabol agitation start from kolhapur | कोल्हापूर : अंबाबाईला साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरू

कोल्हापूर : अंबाबाईला साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरू

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा चौथा आणि अखेरचा टप्पा सोमवारपासून कोल्हापुरातून सुरू झाला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ यांच्यासह नेते-कार्यकर्त्यांनी अंबाबाईच दर्शन घेतलं.

''इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो हेच साकडे अंबाबाईला घातले, आज राज्यात शेतकरी समाधानी नाही. या सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला. आम्ही सरकारमध्ये असताना या भागात विशेष लक्ष होते आज राज्याची परिस्थिती काय आहे?'', असे अनेक मुद्दे यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केले.

महागाई, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्‍न यांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे.

 

Web Title: ncp 4th phase hallabol agitation start from kolhapur