शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगडमध्ये राष्ट्रवादी जि.प.च्या सर्व जागा जिंकणार

By admin | Updated: June 4, 2016 00:30 IST

के. पी. पाटील : काँगे्रसचे नेते सेनेचे झेंडे घेऊन मिरवत असल्याची टीका

गारगोटी : ‘भुदरगड तालुक्यातील सर्वांत मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. स्वत:ला काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणवणारे शिवसेनेचे झेंडे खांद्यावर घेऊन कार्यक्रमात पुढे असतात’, अशी घणाघाती टीका माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली.ते कूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साताप्पा खोंद्रे होते.ते पुढे म्हणाले, ‘मोदींच्या फसव्या लाटेने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या लाटेत निवडून आलेल्या आमदारांनी ‘शायनिंग इंडिया’चे खोटे स्वप्न राज्याला दाखवित राज्याची अवस्था दयनीय केली आहे. यावेळी ‘बिद्री’चे संचालक जीवनराव पाटील प्रास्ताविकात म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या तालुक्यातील हा पाचवा मेळावा आहे. यानिमित्त मी विरोधकांना असे आव्हान करतो की, जर केडीसीसी बँकेची निवडणूक लागली तर त्यांनी स्वत: उभे राहावे. गरीब कार्यकर्त्यांचा बळी देऊ नये.यावेळी माजी आमदार नामदेवराव भोईटे म्हणाले, के. पी. पाटील यांच्याकडे निर्णयक्षमता असल्यानेच कर्जबाजारी असलेल्या बिद्री कारखान्यावर को-जन. प्रकल्प उभारून यशस्वी केला आहे. डिस्टिलरी प्रोजेक्ट परत घालविला त्या दिनकरराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही. आज कारखाना सक्षम आहे.मेळाव्यात अनिल हळदकर, बाजीराव राजिगरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मिणचे खोऱ्यातील मडिलगे, गंगापूर, म्हसवे, निळपणसह गारगोटी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यास माजी जि. प. सदस्य पी. डी. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, सभापती विलास कांबळे, माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार, धनाजीराव देसाई, रणजितसिंह पाटील, मुदाळचे सरपंच प्राचार्य विकास पाटील, सुनील कांबळे, विलास झोरे, ‘बिद्री’चे माजी संचालक मधुकर जाधव, टी. एल. पाटील, माजी सरपंच वसंतराव चोडणकर, पै. विष्णुपंत हळदकर, माजी सरपंच अण्णासो पाटील, माजी उपसरपंच मदन पाटील, अ‍ॅड. मोहन पाटील, सरपंच रूपाली खोत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)