भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्याध्यक्षपदी नाथाजी पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:28 IST2024-08-21T15:27:03+5:302024-08-21T15:28:07+5:30
गारगोटी: भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आणि त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर ...

भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्याध्यक्षपदी नाथाजी पाटील
गारगोटी: भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आणि त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र आज, बुधवारी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बाबनकुळे यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दिले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मान्यतेने व खासदार धनंजय महाडीक, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे, समन्वयक राहुल चिकोडे, अलकेश कांदळकर यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली. गेली २७ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केल्याची ही पावती असल्याचे नाथाजी पाटील यांनी सांगितले.