नाना पाटेकरांनी मंत्री मुश्रीफांचा केला एकेरी उल्लेख, सर्वजण थबकले; नाना म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:37 IST2022-06-04T11:35:13+5:302022-06-04T11:37:25+5:30
हसन माझा जवळचा दोस्त आहे रे... गैरसमज करून घेऊ नका, तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला, मी हसन... हसन... म्हणत.. म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली,

नाना पाटेकरांनी मंत्री मुश्रीफांचा केला एकेरी उल्लेख, सर्वजण थबकले; नाना म्हणाले..
कोल्हापूर : ‘अरे तू इकडे कशाला आलास.. मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो.’ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा असा एकेरी उल्लेख केलेला ऐकून सोबत असलेले सर्वजण थबकले. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘असं नाही.... पाहुण्यांचं स्वागत व आदरातिथ्य करणं ही आमची कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत.’ यावेळी नाना आणि मुश्रीफ यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या.
कागल येथे आज, शनिवारी होणाऱ्या पुतळा अनावरणासाठी नाना पाटेकर हे काल, शुक्रवारी सकाळीच कोल्हापुरात आले. हे समजताच मंत्री हसन मुश्रीफ हे कागलहून कोल्हापुरात आले. मंत्री मुश्रीफ आपल्या भेटीला येत असल्याचे समजताच नाना पाटेकर हे त्यांच्या स्वागतासाठी खोलीच्या बाहेर लॉबीत येऊन उभे राहिले. मंत्री मुश्रीफ यांना पाहताच त्यांनी कडकडून मिठी मारली.
यावेळी नाना पाटेकर म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास.. मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो.’ यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘असं नाही.... पाहुण्यांचं स्वागत व आदरातिथ्य करणं ही आमची कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत.’ यावेळी नाना आणि मुश्रीफ यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या.
हसन माझा जवळचा दोस्त....
मंत्री मुश्रीफ यांचा नानांनी केलेला एकेरी उल्लेख ऐकून सोबत असलेले व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर व उपस्थित सर्वजण क्षणभर थबकलेचं, त्यावेळी नाना म्हणाले, हसन माझा जवळचा दोस्त आहे रे... गैरसमज करून घेऊ नका, तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला, मी हसन... हसन... म्हणत.. म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली, असा किस्साही नानांनी यावेळी सांगितला.